साताऱ्यात पत्रकारांसाठी पत्रकारांनीच उभारले ‘कोरोना केअर’ सेंटर!

यवतेश्वर येथे हॉटेल 'निवांत'मध्ये पत्रकारांसाठी 'कोरोना सेंटर' सुरू

0

सातारा : साताऱ्यात राज्यातील पत्रकारांसाठी पहिले कोरोना केअर सेंटर (आयसोलेशन) सुरू करण्यात आले आहे. साताऱ्यातील यवतेश्वर येथील हॉटेल ‘निवांत’मध्ये पत्रकारांनीच हे सेंटर सुरू केले आहे.

लॉकडाऊनच्या  काळात पत्रकारांनी प्राणाची बाजी लावून  प्रत्येक घटनेच्या माहिती संकलित करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावले.  काही पत्ररकारांना  प्राणास मुकावे लागले.  याची दखल घेऊन सातारा जिल्हा पत्रकार संघाने प्रशासनाच्या सूचनांनुसार नियमावली तयार केली आहे. त्याचप्रमाणे सातार्‍यातील ज्या पत्रकारांच्या घरी होम आयसोलेशनची सोय नाही, अशाच कोरोनाबाधित पत्रकारांसाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. या सेंटरमध्ये दोन ऑक्सिजन मशिनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शिवाय आरोग्य विभागाकडून एक डॉक्टर आणि दोन नर्स या सेंटरमध्ये उपलब्ध असणार आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.