खडसेंच्या प्रवेशाआधी जितेंद्र आव्हाड शरद पवारांच्या भेटीला, चेहऱ्यावर तणाव
स्वत:चे स्थान सोडण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड हे देखील अनुत्सुक
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांना कोणती जबाबदारी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलं असतानाच जितेंद्र आव्हाड हे शरद पवार यांच्या भेटीसाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे दाखल झाले असल्याची माहिती हाती येत आहे. आव्हाडांकडे गृहनिर्माण खाते आहे. ते आपले खाते देण्यासाठी तयार नसून यासंबंधी चर्चा करण्यासाठी ते शरद पवार यांच्याकडे गेले असल्याचे सांगण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांना कोणती जबाबदारी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच जितेंद्र आव्हाड हे शरद पवार यांच्या भेटीसाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे दाखल झाले असल्याची माहिती हाती येत आहे. आव्हाडांकडे गृहनिर्माण खाते आहे. ते आपले खाते देण्यासाठी तयार नसून यासंबंधी चर्चा करण्यासाठी ते शरद पवार यांच्याकडे गेले असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी आव्हाडांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता. कृषीमंत्रिपद किंवा गृहनिर्माण मंत्रिपद खडसेंना देणार, अशी चर्चा आहे. एकनाथ खडसे यांच्याकडे कृषीमंत्रिपद सोपवले जाणार, असे यापूर्वी सांगितले जात होते. मात्र, शिवसेना कृषीमंत्रिपद सोडायला तयार नाही, अशी माहिती आता पुढे येत आहेत. तसेच खडसे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशासाठी स्वत:चे स्थान सोडण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड हेदेखील अनुत्सुक असल्याचे समजते. दरम्यान, ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्वाधिकार आहेत. ते जो निर्णय घेतील, जो आदेश देतील त्याचे पालन करणे हे शिवसैनिकाचे काम आहे आणि दादा भूसे एक शिवसैनिक आहे’, अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. एकनाथ खडसे यांचा थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर खडसेंना मंत्रिमंडळात स्थान द्यायचे की नियोजन मंडळावर त्यांची वर्णी लावायची, याबाबत महाविकास आघाडीत संभ्रम असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, शिवसेना कृषीमंत्रीपद सोडण्यास तयार नसल्याची माहिती मिळते आहे . त्याचबरोबर जितेंद्र आव्हाडही आपल्याकडील गृहनिर्माण खाते खडसेंना देण्यास तयार नसल्याचे समजते. शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात बऱ्याच वेळापासून चर्चा सुरू, अर्ध्या तासापासून दोघांमध्ये चर्चा, ही चर्चा लांबण्याची शक्यता, जितेंद्र आव्हाड यांची पवारांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याची सूत्रांची माहिती, खडसे यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात शरद पवार उशिरा पोहोचण्याची शक्यता, जयंत पाटील यांनी वाय बी चव्हाण इथे फोन केल्याची सूत्रांची माहिती, पक्ष कार्यालयातून फोन आल्याशिवाय निघू नका, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.