वैजापूरमध्ये मराठा आरक्षणासाठी जलसमाधी आंदोलन

शिवक्रांती सेनेच्या कार्यकर्त्यांसह सहा जणा पोलिसांच्या ताब्यात

0

औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत योग्य पद्धतीने बाजू न मांडल्याचा आरोप करत शिवक्रांती सेनेच्या वतीने वैजापूरमधील बोर दहेगाव मध्यम प्रकल्पात आज (5 ऑक्टोबर) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जलसमाधी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.

शिवक्रांती सेनेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत योग्य पद्धतीने बाजू न मांडल्याचा आरोप करत  वैजापूरमधील बोरदहेगाव मध्यम प्रकल्पात आज (5 ऑक्टोबर) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जलसमाधी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. परंतु नियोजित वेळेच्या अगोदरच गनिमी कावा करत आंदोलन करणार्‍या शिवक्रांती सेनेच्या कार्यकर्त्यांसह सहाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.  आंदोलनाच्या अनुषंगाने बोरदहेगाव मध्यम प्रकल्प व परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनी या परिसरात सोमवारी सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत कलम 144 लागू केले. ठरलेल्या नियोजित वेळेच्या अगोदर गनिमी काव्याने एक मराठा, लाख मराठा, अशा घोषणा देत पाण्यात उतरून जलसमाधी घेण्याअगोदर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. शिवक्रांती सेनेचे अध्यक्ष सुनील बोडखे, सोमनाथ मगर, विक्रम शिंदे, संजय सावंत व इतरांना अटक करून वैजापूर पोलिस ठाण्यात आणले आहे. प्रकल्प परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.