देवबंदमधून 2 दहशतवाद्यांना अटक, जैशसाठी तरुणांना करत होते भरती

0

उत्तरप्रदेशच्या सहारनपूरमध्ये गुरुवारी (दि. 21) रात्री देवबंदच्या एका खाजगी हॉस्टेलमधून जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यातील एक जम्मू-काश्मीरच्या पुलवामा तर दुसरा  कुलगामचा रहिवासी आहे. शहनवाज अहमद तेली आणि आकिब अहमद असे ताब्यात घेतलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. दोघेही जैश-ए-मोहम्मदसाठी  दहशतवाद्यांची भरती करत होते.

याबाबत उत्तर प्रदेशचे डीजीपी ओपी सिंह यांनी सांगितले, हे दोन्ही दहशतवादी प्रवेश न मिळवता हॉस्टेलमध्ये राहत होते. त्यांच्याकडे दोन पिस्तुल आणि 30 काडतुसे जप्त करण्यात आली. काही व्हिडिओ आणि दहशतवाद्यांशी केलेली चॅटींगदेखील तपासण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी पोलिस दोघांची चौकशी करत आहेत.

सिंह यांनी सांगितले, की दोन्ही दहशतवाद्यांचा पुलवामा हल्ल्याशी संबंध असल्याची शक्यता आहे. त्यांनी तरुणांना जैशमध्ये भरती केले आहे. त्या प्रकरणी त्यांची सखोल चौकशी केली जात आहे. दोघे स्थानिक स्तरावर कोण-कोणत्या लोकांच्या संपर्कात आहेत, याची तपासणी केली जात आहे.

यापूर्वी उत्तरप्रदेशच्या एटीएसने एका दुकानदारासह जवळपास 10 ते 12 विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले होते. त्यामध्ये 2 काश्मीरी विद्यार्थी, 5 ओडिसा आणि विविध ठिकाणांच्या विद्यार्थ्यांना रात्री उशीरा ताब्यात घेतले होते.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.