जागरण गोंधळी मीरा कावळे यांचे शासनाकडे मदतीचे आवाहन

नियम व अटीच्या शर्तीसह जागरण कार्यक्रमास परवानगीची मागणी

0

सुलतानपूर : कोरोना महामारीमुळे व सततच्या लॉकडाऊनमुळे जागरण गोंधळ कलावंतांवर उपसमारीची वेळ आली आहे. महाराष्ट्र राज्य वाघ्या मुरळी परिषदेच्या वतीने कलवंतांची आर्थिक बाजू मजबूत व्हावी, यासाठी विविध मागण्या शासनाकडे करण्यात आल्या आहेत.
कोरोना महामारीमुळे मागील पाच महिन्यांपासून लॉक़डाऊन आहे. यामुळे राज्यातील लोक कलावंत व त्यांच्या कुटुंबावर उपासमारची वेळ आली आहे. जागरण गोंधळ कार्यक्रम करणाऱ्या वाघ्या मुरळी कलवंतांकरिता उदरनिर्वाहासाठी विशेष निधी अनुदान स्वरुपात मंजूर करावा, कलावंतांच्या मुला-मुलींचा शैक्षणिक खर्च शासनामार्फत करण्याची विनंती, घरे, जमीन, क़ायमस्वरूपी पेंशन यासह लोक कलावंतासाठी स्वतंत्र लोक कलावंत आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे. यासह जागरण गोंधळ कार्यक्रमास तात्काळ परवानगी द्यावी, अशा विविध मागण्यांकरिता वाघ्या मुरळी परिषदेंतर्फे खुलताबाद येथे बैठक घेण्यात आली.
यावेळी प्रसिद्ध लोककलावंत तसेच जागरण गोंधळ मराठवाडा प्रदेश अध्यक्षा मीरा चंद्रकांत कावळे या देखील सदर परिषदेत उपस्थित होत्या. व मागील काही महिन्यांपासून असलेल्या लॉकडाऊनमुळे लोककलवंतांंवर उपासमारीची वेळ आली आहे.  आर्थिक अडचणीचा कलावंतांना सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले.  शासनाने लवकरात लवकरात लवकर लोक कलावंतांंच्या मागण्या पूर्ण कराव्या; अन्यथा आम्हा लोककलावंतांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल, असे  त्या   म्हणाल्या. या बैठकीत दौलत आबा चव्हाण, सोमनाथ नांगरे, अण्णाभाऊ चतरु राठोड़, राहुल वामन बनकर, दत्तू देवदास करपे, चंद्रकांत कावळे,  मीरा कावळे यांच्यासह असंख्य लोककलावंत उपस्थित होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.