मराठा समन्वयकांचे क्रांतीची मशाल पेटवत ‘जागरण गोंधळ’ आंदोलन
'जागरण गोंधळ' , दहा मराठा समन्वयक आंदोलकांवर गुन्हा दाखल
औरंगाबाद : मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी क्रांतीचौकात मशाली पेटवून जागर गोंधळ आंदोलन करणार्या 10 मराठा आंदोलकांवर क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक वेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अनेक मंत्र्यांना भेटून व आंदोलनाच्या माध्यमातून मागणी मान्य करण्याचे निवेदन देण्यात आले, मात्र राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप करीत मराठा समन्वयक यांनी सोमवारी क्रांतीचौक उड्डाणपुलाखाली क्रांतीची मशाल पेटवत जागरण गोंधळ आंदोलन केले. यावेळी राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात पोलिस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दहा पदाधिकारी कार्यकर्त्यांवर क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आंदोलनकर्ते, किशोर चव्हाण, ज्ञानेश्वर आसाराम गायकवाड, संजय रामभाऊ सावंत, सुनील विठ्ठलराव काठेकर, नीलेश गुलाराव ढवळे, प्रकाश नारायण हेंडगे, रवींद्र भानुदास काळे, देवीदास रमेश क्षीरसागर, कृष्णा मारोती ठोंबरे, नंदू अशोक गरड, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आंदोलकांची नावे आहेत.