फाशी घेण्याची वेळ आली होती, इतके भाजपातील एका व्यक्तीने छळले – खडसे

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीसांवर घणाघात

0

जळगाव : फाशी घेण्याची वेळ आली होती, इतके भाजपमधील एका व्यक्तीने मला छळले, अशा शब्दात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीसांवर  घणाघाती टीका केली आहे. आता फक्त दोनच पक्ष राहिले. यापुढे महाविकासआघाडी आणि राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार, अशी गर्जनाही एकनाथ खडसेंनी केली.

जळगावच्या मुक्ताईनगर येथे एकनाथ खडसें बोलत होते. फाशी घेण्याची वेळ आली होती, इतके भाजपमधील एका व्यक्तीने मला छळले, अशा शब्दात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीसांवर  घणाघाती टीका केली   यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. ‘मला अक्कल शिकवायला चालले होते. मी अख्खे आयुष्य भारतीय जनता पार्टीला दिले. माझा मुलगा गेला तरीही मी भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ राहिलो. पण मला एका माणसाने छळले.’ असे म्हणत खडसेंनी देवेंद्र फडवणीस यांना टोला लगावला. मी भल्याभल्यांना मुख्यमंत्री पद दान करत असतो. त्यामुळे असे समजा की उत्तर महाराष्ट्रात मुख्यमंत्रीचा दावेदार असलेले हे पद मी ब्राह्णामला दान म्हणून दिले. गल्लीतीील कार्यकर्ते मी मोठे केले आणि आता तेच मला अक्कल शिकवायला लागले, असेही म्हणत खडसेंनी भाजपवर टीका केली. ज्या ताटात खातात त्याच ताटात शेंद करणारा मी नाही. तर शेतामध्ये काय उगवतं तर टरबूज असा नाव न घेता खडसेंनी फडणवीसांना टोला लगावला. भाजपाने एका व्यक्तीच्या लाडापोटी माझ्यासारख्यांना बाजूला केले. एका व्यक्तीमुळे सरकारचे वाटोळं झाले. मला या पक्षातून छळ करत ढकलण्यात आले. त्यामुळे यंदा भाजपचे सरकार हे कोणामुळे आले नाही. हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे ,अशी थेट टीका करत चाळीस वर्षात एकही आरोप माझ्यावर नव्हते. पण या दीड वर्षात बाईपासून ते विनयभंगांपर्यंत खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. असे काय झाले नाथाभाऊचे अजूनपर्यंत याचे उत्तर मला मिळालेले नाही, असेही खडसे म्हणाले. भाजपला मी आता करून दाखवतो, असा थेट इशारा यावेळी खडसेंनी दिला. यावेळी बोलताना खडसेंनी भाजपचे सरकार यापुढे येणार नाही, असा ठाम विश्वास व्यक्त केला. माझ्याजवळ आमदार नाही, खासदार नाही पण तरीसुद्धा माझ्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते आहे आणि हे मी भाजपला दाखवून देणार आहे, असा थेट इशारा यावेळी खडसेंनी दिला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.