शाळा सुरू झाली तरी शाळेत येणे सक्तीचे नाही; राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंची माहिती

सरकारने जबाबदारी घेऊनच शाळा सुरू करण्याचा निर्णय

0

अहमदनगर :  शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरी मुलांना शाळेत येणे सक्तीचे नाही, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंनी दिली आहे. मुले घरी राहूनदेखील ऑनलाईन शिक्षण घेऊ शकतात, असेही राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले आहेत. ते अहमदनगरला पत्रकारांशी बोलत होते.

सरकारने जबाबदारी घेऊनच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र एखाद्या ठिकाणी जास्त उद्रेक झाला, तर स्थानिक प्रशासनाला निर्णय घेण्यास सांगितल्याचे तनपुरे यांनी अधोरेखित केले आहे. त्याचबरोबर शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षण विभागाच्या सचिवाशी माझी चर्चा झाली आहे. मुलांना शाळेत पाठवणे सक्तीचे नसून ऑनलाईन शिक्षण सुरू राहील, असेही प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना संकट आणि लॉकडाऊमुळे बंद असलेल्या शाळा येत्या 23 नोव्हेंबरपासून सुरु होण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. त्यानुसार नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग भरवण्याचे नियोजन आहे. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेने, शाळा उघडण्याबाबत अनेक जिल्ह्यांत संभ्रम दिसत आहे. राज्य सरकारने शाळांबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर सोपवल्याने या संभ्रमात आणखी भर पडली आहे. नेमका कोणता निर्णय घ्यायचा?, पालकांची संमती कशी मिळवायची?, विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, याबाबत खबरदारी कशी घ्यायची? शिवाय 50 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती असली तरी 50 टक्के विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन असेल, त्याचे व्यवस्थापन कसे करायचे, असा प्रश्न शिक्षक आणि प्रशासनासमोर आहे. दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेने मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील सर्व शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अन्य जिल्ह्यांत शाळा सुरू होणार की नाही याबाबत संभ्रम आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.