विविध पक्ष नेते पाहणी दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या हाती काय हे महत्त्वाचे

मुख्यमंत्री सोलापुरात, फडणवीस बारामतीत, राज्यातील दहा नेते शेतकऱ्यांच्या बांधावर

0

मुंबई : परतीच्या पावसामुळं झालेल्या नुकसानाची पाहणीसाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह विविध नेतेमंडळी शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी दौ ऱ्यावर आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांसह सर्वपक्षीय नेते शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी करणार आहेत. या विविध पक्षांच्या नेत्यांच्या पाहणी दौऱ्यानंतर शेतकऱ्यांना काय मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोमवारी (19 ऑक्टोबर) सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरातही उपस्थित आहे. यावेळी ते सांगवी, अक्कलकोट येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधतील. सकाळी 10.15 वाजता उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील काटगाव आणि अपसिंगा येथे अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची  तसेच शेत पिकांच्या नुकसानीची ते पाहणी करतील. त्यानंतर तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे पूरपरिस्थितीबाबत लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्याशी चर्चा करतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापूर दौऱ्यानंतर बुधवारी (21ऑक्टोबर) उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्ष विभागाने मुख्यमंत्री हे बुधवारी उस्मानाबाद जिल्हा दौरा करणार असल्याची माहिती दिली. यावेळी उद्धव ठाकरे उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील काटगाव आणि अपसिंगा येथे अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची  तसेच शेती पिकांच्या नुकसानीची ते पाहणी करणार आहेत.

राज्यातील अनेक नेते शेतकऱ्यांच्या बांधावर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे – सोलापूर, बाळासाहेब थोरात – सोलापूर, दत्ता भरणे – पालकमंत्री (मुख्यमंत्र्यांसोबत), दादा भुसे – कृषिमंत्री (मुख्यमंत्र्यांसोबत), सिद्धेश्वर स्वामी, खासदार भाजप (मुख्यमंत्र्यांसोबत), ओमराजे निंबाळकर – खासदार शिवसेना (मुख्यमंत्र्यांसोबत), आमदार – ज्ञानराज चौगुले, शिवसेना (मुख्यमंत्र्यांसोबत), आमदार – कैलास पाटील, शिवसेना (मुख्यमंत्र्यांसोबत), आमदार – राणा जगजीतसिंह पाटील, भाजप (मुख्यमंत्र्यांसोबत), माजी आमदार – मधुकरराव चव्हाण, काँग्रेस (मुख्यमंत्र्यांसोबत) , छगन भुजबळ- नाशिक, ⏺️देवेंद्र फडणवीस – बारामती, प्रवीण दरेकर – बारामती, विजय वडेट्टीवार – सोलापूर, राजू शेट्टी –   बारामती, राजेश टोपे – परभणी, उदय सामंत – रत्नागिरी (खारेपाटण), अब्दुल सत्तार – जालना, शरद पवार – उस्मानाबाद.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.