… ड्रग्जचा साठा यापूर्वीही आणल्याचा खुलासा, गर्दुल्यांची माहिती गुलदस्त्यात

...त्यांची महिनाभरात तिसरी खेप, पोलिसांसमोर ड्रग्ज साखळीचा म्होरक्या शोधण्याचे आव्हान

0
औरंगाबाद  :   आयुक्तांच्या विशेष पथकाने मुंबईहून अमली पदार्थ शहरात विक्रीसाठी आणताना पंचवटी चौकात नगरसेवकाच्या कारमधून दोघांना चरस व एम.डी. नावाच्या अमली पदार्थांसह अटक केली होती. या प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली असून पकडलेल्या दोघांनी यापूर्वीही अनेकवेळा ड्रग्जचा साठा शहरात आणला असून ही त्यांची महिनाभरात तिसरी खेप होती, अशी माहिती सूत्रानुसार मिळाली. मात्र त्यांनी तो ड्रग्ज कोणाला विकला कोणासाठी आणला गेला हे स्पष्ट झालेले नाही.
नगरसेवकाच्या कारमधून दोघांना चरस व एम.डी. नावाच्या अमली पदार्थांसह अटक केली होती. या प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली असून पकडलेल्या दोघांनी यापूर्वीही अनेकवेळा ड्रग्जचा साठा शहरात आणला असून ही त्यांची महिनाभरात तिसरी खेप होती, अशी माहिती सूत्रानुसार मिळाली. असिक अली आणि नुरोद्दीन सय्यद या दोन तस्करांच्या मंगळवारी पोलिसांनी पंचवटी चौकात मुसक्या आवळल्या. त्यांच्या ताब्यातून मेफोड्रोन व चरस नावाचे घातक अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. दोघांना अटक केल्यावर पोलिसांकडून चौकशी सुरू आहे, दरम्यान दोघांनी या पूर्वी देखील मुंबईहून शहरात अंमली पदार्थाचा साठा आणल्याचे समोर आले आहे. गेल्या आठवड्यातच त्यांनी ड्रग्जची खेप आणली होती तर सुमारे महिनाभरापूर्वी अजून एकवेळा ड्रग्जचा साठा शहरात आणण्यात आला होता.असे सूत्रानुसार कळते. गेल्या महिनाभरात ड्रग्स आणण्याची ही तिसरी वेळ आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ही मंडळी ड्रग्ज कोणासाठी आणत होती.आरोपी स्वतः हा तस्करीचा व्यवसाय करतात की सूत्रधाराच्या आदेशाने कमिशनवर हे ड्रग्ज आणतो हे समोर आलेले नाही. आरोपी जरी तोंड उघडत नसले तरी पोलिसांच्या खबर्‍यांची समांतर टीम या साखळीचा शोध घेण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहेत. ड्रग्ज नेमके कोठून आणले होते?, कोणाच्या सांगण्यावरून आणले? कोणासाठी आणले?कोणाला विकणार होते? कधीपासून हे रॅकेट सक्रिय आहे? या मागे कोण आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सध्या गुलदस्त्यातच असून वरून खालपर्यंत ही साखळी शोधण्याचे शहर पोलिसांसमोर एक मोठे आव्हान आहे.
Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.