‘जलयुक्त शिवार’प्रमाणे रस्त्यांच्या कामाची चौकशी करा- ग्रामविकास मंत्री मुश्रीफ
सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत रस्त्यांच्या कामाची चौकशीची मागणी
कोल्हापूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेप्रमाणे गेल्या पाच वर्षातील सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत झालेल्या रस्त्यांच्या कामाची चौकशी करा, अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युतीच्या सरकारच्या काळात ‘जलयुक्त शिवार’ योजना राबवण्यात आली. ही योजना फडणवीसांची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना असल्याचे बोलले गेले. मात्र, आता या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा दावा ‘द युनिक फाऊंडेशन’च्या अहवालात केला होता. जलयुक्त शिवार योजनेबाबत कॅगने चौकशी केली होती. त्या चौकशी अहवालात ही योजना बरोबर राबवण्यात आली नाही, असे नमूद करण्यात आले आहे. या योजनेचा कोणताही फायदा झाला नाही. विदर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झालेली नाही. त्यामुळे या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे याची संपूर्ण चौकशी व्हावी, यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होईल, असेही अनिल देशमुखांनी स्पष्ट केले होते. जलयुक्त शिवारावर कॅगने ताशेरे ओढले होते. त्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. हा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. त्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत झालेल्या रस्त्यांच्या कामाची चौकशी करा, अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.
जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी
जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा मोठा निर्णय ठाकरे मंत्रिमंडळानं घेतला आहे. फडणवीस सरकारच्या काळात जलयुक्त शिवार ही भाजपाच्या यशस्वी योजनांमधली एक समजली जात होती. पण आता तीच योजना चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. जलयुक्त शिवारमध्ये ९ हजार कोटी वापरले होते. परंतु पाण्याची पातळी वाढली नाही, अशीही माहिती उघड झाली आहे. तसेच या सर्व प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय ठाकरेंच्या मंत्रिमंडळानं घेतला आहे.