मुलांच्या नावे पीपीएफमध्ये महिन्याला हजार रुपये गुंतवा, 15 वर्षांत मोठा फंड

मुलांच्या नावावर 10 व्या वर्षापासून पीपीएफमध्ये गुंतवणूक; ते 25 वर्षांची होईपर्यंत पीपीएफ मॅच्युअर

0

नवी दिल्ली : सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच (पीपीएफ) हा गुंतवणुकीसाठी चांगला मार्ग मानला जातो. या योजने अंतर्गत सध्या वार्षिक 7.1 टक्के दराने व्याज दिले जाते, जे बँक मुदत ठेवींपेक्षा (फिक्स डिपॉझिट) जास्त आहे. त्यामुळेच आपल्या मुलांच्या नावे पीपीएफ खाते उघडून त्यांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी हा चांगला पर्याय मानला जातो.

आपल्या मुलांच्या नावे या योजनेत 15 वर्षांसाठी गुंतवणूक करुन आपण एक मोठा फंड तयार करू शकता. जर आपण मुलांच्या वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांच्या नावावर पीपीएफमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली, तर मुले 25 वर्षांची होईपर्यंत पीपीएफही मॅच्युअर होईल. या योजने अंतर्गत महिन्याला केवळ एक हजार रुपये गुंतवूण तुम्ही 15 वर्षात सुमारे 3.20 लाख रुपयांचा निधी तयार करू शकता. म्हणजेच तुम्ही पंधरा वर्षांत एक लाख 80 हजारांची गुंतवणूक करुन तीन लाख 20 हजारांचा फंड जमा करु शकता. तर तुम्ही महिन्याला 2 हजार रुपये गुंतवणूक करुन 15 वर्षात सुमारे 6.40 लाख रुपयांचा निधी तयार करू शकता. 15 वर्षांनंतर आवश्यकता असल्यास मुले खात्यातून पैसे काढू शकतील, किंवा तातडीने गरज नसेल तर पीपीएफ 5 वर्षांसाठी वाढवू शकता. पुढील पाच वर्षांसाठी यात गुंतवणूक सुरु ठेवणे आवश्यक नाही. अधिक गुंतवणूक न करताही आपल्या ठेवीवर 7.1 टक्के व्याज मिळणे सुरू राहील. मुले 30 वर्षांची झाल्यावर ते पैसे काढू शकतात. तेव्हाही त्यांना पैशांची गरज नसेल, तर आणखी पाच वर्षांसाठी ही मुदत वाढवता येऊ शकते.

केवळ पाचशे रुपयांत खाते उघडा

पीपीएफ खाते उघडण्यासाठी लागणारी किमान रक्कम 500 रुपये आहे. आर्थिक वर्षात किमान 500 रुपये जमा करणे आवश्यक आहे, तर जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा वर्षाकाठी 1.5 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

कर सवलतीचा लाभ

पीपीएफ ‘ईईई’च्या श्रेणीत येते. म्हणजेच तुम्हाला या योजनेत केलेल्या संपूर्ण गुंतवणूकीवर कर सवलतीचा लाभ मिळतो. तसेच या योजनेतील गुंतवणुकीपासून त्यावर मिळणाऱ्या संपूर्ण व्याजाच्या रकमेवर कोणताही कर भरावा लागत नाही. पीपीएफ गुंतवणुकीवरील व्याजदर प्रत्येक तीन महिन्यांनी बदलत असतात.

कर्जही काढण्याची सुविधा

तुम्ही पीपीएफ खात्यावर जमा रकमेवर कर्जही घेऊ शकता. आपण पीपीएफ खाते उघडले त्या आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर एका आर्थिक वर्षापासून ते पाचव्या आर्थिक वर्षाच्या समाप्तीपर्यंत, पीपीएफकडून कर्ज घेण्याचे आपल्याला अधिकार आहेत. जर आपण जानेवारी 2017 मध्ये पीपीएफ खाते उघडले असेल तर आपण 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2022 पर्यंत कर्ज घेऊ शकता. ठेवीवर तुम्ही जास्तीत जास्त 25 टक्के र्ज घेऊ शकता. पीपीएफ खाते पोस्ट ऑफिस किंवा बँकेत स्वत: च्या नावाने किंवा एखाद्या अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने उघडले जाऊ शकते. नियमांनुसार पीपीएफ खाते हिंदू अविभाजित कुटुंबाच्या (एचयूएफ) नावे उघडता येत नाही.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.