सचिन तेंडुलकर म्हणजे क्रिकेटचा देव. आज सचिनचा 45 वा वाढदिवस आहे. भारतासह संपूर्ण जगातील क्रिकेट प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा सचिन तब्बल 24 वर्षे क्रिकेट क्षेत्रात कार्यरत होता. मात्र त्याने जेव्हा क्रिकेटमधून सन्यास घेतला तेव्हा अनेकांना अश्रू अनावर झाले होते. तोच सचिन आज वयाची 45 वर्षे पूर्ण करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्याबाबतच्या काही रंजक गोष्टी…
* सचिनचे वडिल रमेंश तेंडुलकर यांनी प्रसिद्ध संगीतकार सचिन देव यांच्या नावावरून त्याचे नाव ठेवले होते.
* सचिनने, सचिन डॉन ब्रॅडमन यांच्या 29 शतकांची बरोबरी केल्यानंतर मायकल शुमाकर यांनी त्याला फेरारी-360 मोडिना बक्षिस म्हणून दिली होती. सचिनला गाड्यांची क्रेझ आहे.

* सचिनला घड्याळ आणि परफ्युमचा प्रंचड छंद आहे. तो वेगवेगळे घड्याळ आणि परफ्युम जमा करतो.
* सचिन आतापर्यंत जगभरातील तब्बल 90 स्टेडिअमवर खेळला आहे.
* भारतासाठी सचिन आतापर्यंत 400 पेक्षा जास्त एकदिवसीय सामने आणि 200 कसोटी सामने खेळला आहे.
* त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये 18 हजार 426 तर कसोटी सामन्यांत 15 हजार 921 धावा करून क्रिकेटमध्ये प्रथम स्थान पटकावले आहे.
* सचिनने कमी वयातच क्रिकेट जगात पाऊल ठेवले. तो वयाच्या 16 व्या वर्षी पाकिस्तान विरुध्द पहिला कसोटी सामना खेळला होता.
* एका वर्षात सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रमदेखील सचिनच्या नावावरच आहेत. त्याचा हा विक्रम अद्याप कोणताच खेळाडू मोडू शकलेला नाहीये.
* 2003 साली झालेल्या विश्वचषकात सचिनने 673 धावा काढून ‘मॅन ऑफ द मॅच’ किताब जिंकला होता. विश्वचषकात आतापर्यंत असा खेळाडू झाला नाहीये.
* सचिनने तब्बल 15 वेळा ‘मॅन ऑफ द टुर्नामेंट’चा किताब पटकावलेला आहे. त्याचा हा रेकॉर्ड अद्याप कोणीच मोडू शकलेले नाही.
