तुरीच्या पिकात गांजाचे आंतरपीक, 6 लाख 69 हजारांचा 133 किलो गांजा जप्त

माढा तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी तुरीच्या पिकात अंतर्गत पीक म्हणून गांजाची लागवड

0

सोलापूर :  सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी भरीव उत्पादनासाठी भलताच प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे. माढा तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी तुरीच्या पिकात अंतर्गत पीक म्हणून गांजाची लागवड केली. माढा तालुक्यातील भावी येथील हा धक्कादायक प्रकार आहे .

बावी गावातील आपल्या मालकीच्या शेतात बंडू मोरे आणि जरीचंद मोरे या दोघांनी तुरीच्या पिकामध्ये बेकायदा बिगरपरवाना गाजांच्या झाडांची लागवड करुन दोन ते पाच फुटांची उंचीची झाडाची जोपासताना हे दोघे शेतकरी आढळले . पोलिसांनी तुरीच्या पिकात अंतर्गत पध्दतीने लागवड केलेली गाजाची झाडे काढुन ती जप्त केली गेली. बंडू औदुंबर मोरे, जरीचंद विश्वनाथ मोरे या दोन शेतकऱ्यांनी तूरीच्या पिकात गांजाची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली आणि बंडू मोरेला ताब्यात घेतले. पोलिसांनी धाड टाकत या शेतकऱ्यांवर कारवाई केली. या प्रकरणात पोलिसांनी तब्बल 6 लाख 69 हजार 500 रुपये किंमतीचा 133 किलो गांजा जप्त केला आहे.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.