बहुजन मुख्यमंत्री झाला पाहिजे म्हटल्यावर चौकशा लावल्या : एकनाथ खडसे

"भाजपमध्ये बहुजनांकडे दुर्लक्ष झालंय हे मान्यच करावे लागेल"

0

नाशिक : “भाजपला शेटजी-भटजींचा पक्ष म्हटले जात होते. मारवाडी, भटांचा पक्ष, अशी या पक्षाची ओळख होती. मात्र ही ओळख पुसण्यासाठी आम्ही गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, अण्णा डांगें, पांडुरंग फुंडकर यांसारख्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र काम करून पुसण्याचा प्रयत्न केला”, अशी प्रतिक्रिया भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली

“भाजपला पूर्वी मारवाडी, भट-ब्राह्मणांचा, शेटजी-भटजींचा पक्ष आहे, अशी ओळख होती. त्या कालखंडापासून आम्ही काम करतोय. अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत केली. त्यामुळे शेटजी-भटजीचा जो चेहरा होता तो बहुजन समाजाचा चेहरा करण्याचा प्रयत्न केला”, असे एकनाथ खडसे म्हणाले. “२०१४ नंतर मात्र मी बहुजन मुख्यमंत्री झाला पाहिजे ,असे नुसते म्हटले होते. तेव्हापासून माझ्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला. मी चार वर्षे त्या ओझ्याखालीच होतो. भाजपमध्ये बहुजनांकडे दुर्लक्ष झाले हे मान्यच करावे लागेल”, असे एकनाथ खडसे यांनी मत  मांडले. “भाजपमध्ये गेली चारवर्षे मी भीतीच्या सावटाखाली वावरत होतो. कधी माझ्यामागे ईडी, कधी अँटीकप्शन तर कधी विनयभंगासारखी केस दाखल होईल, याची मला नेहमीच चिंता राहायची. आता सर्वांमधून मी निर्दोष सुटलो आहे. या सर्वांतून बाहेर आल्यानंतर माझं टेन्शन कमी झालेले आहे. आता इतरांना टेन्शन देण्याचे काम सुरु करणार आहे”, असा टोला खडसेंनी लगावला. “भाजपमधील काही आमदार माझ्या संपर्कात आहेत. पक्षांतर बंदी कायद्यामुळे सध्या पक्षांतर करणे अडचणीचे आहे. त्यामुळे या पक्षातून त्या पक्षात जाणे अडचणीचं आहे. त्यांना राजीनामा द्यावा लागेल. परत निवडणुकीला सामोरे जावे लागेल. विधानसभेच्या निवडणुका होऊन अवघे 11 महिने झालेले आहेत. पुढच्या चार वर्षांसाठी निवडणुका होणे योग्य वाटत नाही”, असे खडसे म्हणाले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.