बाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

२८ वर्षानंतर लखनऊमध्ये सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल

0

लखनऊ : उत्तर प्रदेशातील लखनऊमधील विशेष सीबीआय न्यायालयाने बाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. बाबरी मशिद उद्धस्त केल्यानंतर २८ वर्षानंतर लखनऊमध्ये सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निकाल दिला आहे.

निकाल वाचन सुरू झाले आहे. घटना पूर्व नियोजित नव्हती, असे निकाल वाचन करताना सांगत न्यायाधीश सुरेंद्र यादव यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, उमा भारती, महंत नृत्यगोपाल दास वगळता इतर २६ आरोपी न्यायालयात हजर होते.  दरम्यान, या निकालानिमित्ताने विशेष न्यायालय परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. १९९२ मध्ये अयोध्येत रामजन्मभूमी आंदोलनात बाबरी मशिद पाडण्यात आली होती. ६ डिसेंबर १९९२ या दिवशी वादग्रस्त बाबरी मशिदचा विध्वंस केल्याची घटना घडली होती.  २७ ऑगस्ट १९९३ पासून सीबीआय या प्रकरणी तपास करीत आहे. ही घटना म्हणजे सुनियोजीत कट असल्याचे सीबीआयने तपासात म्हटले होते. सीबीआयने ३५१ साक्षीदार आणि सुमारे ६०० कागदपत्र पुरावा म्हणून सादर केले. १९ एप्रिल २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.