‘इनरव्हील क्लब, औरंगाबाद’ सेवाभावीच्या वतीने राबवले समाजोपयोगी उपक्रम

कोविड-१९ या काळात कार्यरत कोरोना योद्ध्ये आणि मनपा वैद्यकीय अधिकारी यांचा सत्कार

0

औरंगाबाद  : कोरोनाचे संकट ओढवल्यावर देश लॉकडाऊनमध्ये  घरी आराम करण्याऐवजी समाज मनाशी नाळ जोडलेल्या  महिलांना आपण समाजाचे देणे हा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. ‘इनरव्हील क्लब, औरंगाबाद’ या सेवाभावी संस्थेने जुलैपासून अद्पयापर्यंत अनेक महत्वाचे समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले.

‘इनरव्हील क्लब, औरंगाबाद’ या सेवाभावी संस्थेने जुलैपासून अनेक महत्वाचे समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले. कोविड-१९ या काळात कार्यरत ‘कोरोना योद्ध्ये’  आणि मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर व शहरातील मान्यवर डॉक्टर्स, नर्सेस, पोलिस, फील्डवर जाऊन सर्व्हे करणारे शिक्षक, सफाई कामगार, वॉचमन, भाजीवाले, ड्रायव्हर्स, यांचा सन्मान चिन्ह, देऊन सत्कार केला. तसेच त्यांना मास्क, सॅनिटायझर स्टँड, सॅनिटायझर जार, फेसशिल्ड, मेडिकल गाऊन, हॅन्ड ग्लोव्हज आणि आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप केले. तसेच जागोजागी अडकून पडलेल्या समाजातील गरजूंना आणि निराधार नागरिकांना गृहोपयोगी किराणा सामान, देण्यात आले.
‘आस्थाघर’ या वृद्धाआश्रमाला निवासी ‘सीसीटीव्ही सिस्टम’ बसवून देण्यात आली, ‘बाबा साई’ या एड्सग्रस्त बालकाश्रमातील मुला-मुलींना खाद्यपदार्थ, असा पोषक सकस आहार देण्यात आला, संकल्प या वनराईमध्ये विविध प्रकारची झाडे लावून वृक्षारोपण केले, तसेच तुळशीची रोपे लावून ऑक्सिजन हब निर्माण करण्यासाठी तसेच पर्यावरण संवर्धनाबद्दल सामाजिक बांधिलकी जपली. कोविड -१९ या काळामध्येही मानसिक, शारीरिक आणि सामाजिक स्वास्थ्य कसे राखावे, याबद्दल क्लबच्या डॉ. ईना नाथ यांनी वेबिनारद्वारे समाजातील वेगवेगळ्या घटकातील महिलांना मार्गदर्शन करून कोरोना काळात आपला दैनंदिन आहार कसा असावा, ज्यामुळे आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तीची प्रतिकारशक्ती कशी वाढेल आणि सर्वांची प्रकृती स्वस्थ कशी राहील, याबद्दल आहारतज्ञ प्राची डेकाटे‌ यांनी सविस्तर माहिती देऊन  मार्गदर्शन केले. या पुढील काळातही इनरव्हील क्लब, औरंगाबाद अनेक समाजपोयोगी कार्यक्रम राबवणार आहे, चर्चासत्र आणि  विविध विषयांवरील वेबिनार राबवणार आहे. या सर्व उपक्रमांत अध्यक्षा शीला कुलकर्णी, उपाध्यक्षा लता मुळे, सचिव छाया भोयर, उषा धामणे, वृषाली उपाध्ये, वर्षा पटेल, सुनंदा पाटील, शामल भोगले, मंगल चव्हाण, अलका मेहता, आशा भांड आणि क्लबच्या सभासदांचा सहभाग आणि सहकार्य लाभले.

 

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.