इंदुरीकर महाराज आपल्या सहकाऱ्याच्या निधनाने रडले ढसाढसा
ठाणगाव येथील लोकप्रिय प्रसिद्ध मृदंगाचार्य श्रीहरी रमेश शेळके यांचे अल्पशा आजाराने निधन
नाशिक : येवला तालुक्यातील ठाणगाव येथे लोकप्रिय असलेले प्रसिद्ध मृदंगाचार्य श्रीहरी रमेश शेळके (वय ३०) यांचं अल्पशा आजाराने निधन झाले. कीर्तनाच्या माध्यमातून श्रोत्यांना हसवणारे इंदुरीकर महाराज आपल्या सहकाऱ्याच्या निधनामुळे ढसाढसा रडले. यावेळी कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर भावनाविवश झाले. या दुःखद प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आपल्या किर्तनाच्या माध्यमातून ते आजची परिस्थिती सर्वांसमोर ठेवत असतात. यावेळी ते श्रोत्यांना पोट धरुन हसवतात. पण ढसाढसा रडणारे इंदुरीकर महाराज कोणीच पाहिले नसतील. कीर्तनाच्या माध्यमातून श्रोत्यांना हसवणारे इंदुरीकर महाराज आपल्या सहकाऱ्याच्या निधनामुळे ढसाढसा रडले. श्रीहरी रमेश शेळके यांच्या निधनाने तालुक्यावर शोककळा पसरली. तरुण श्रीहरी अचानक सोडून गेल्याने इंदुरीकर महाराज भावूक झाले. वारकरी सांंप्रदायावर ही शोककळा पसरली. अंत्यसंस्काराप्रसंगी उपस्थित इंदुरीकर महाराज यांना अश्रू अनावर झाले. यावेळी सहकारी मित्र डॉ. चव्हाण यांच्या गळ्यात पडून रडतानाचा महाराजांचा व्हिडिओ राज्यभर व्हायरल होत आहे.