दिवाळीनंतर मंदिरे उघडण्याचे संकेत, ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे सूतोवाच

मंदिर उघडण्याला राज्य सरकारचा मुळीच विरोध नाही. पण त्यापेक्षा लोकांचा जीव महत्त्वाचा

0

चंद्रपूर : दिवाळीनंतर मंदिरे सुरू करणार असल्याचे सूतोवाच मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.  मंदिरे सुरू करण्यासाठी नियमावली तयार केली जाणार आहे. कोरोनाची संभाव्य दुसरी लाट बघता, शासनाने सावध पवित्रा घेतलेला आहे, मंदिरे सुरू करण्यावरून राज्यात विरोधी पक्षांनी सरकारला जाब विचारल्याचेही विजय वडेट्टीवारांनी सांगितले

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. राज्यातील सर्व मंदिरं खुली व्हावीत, अशी मागणी मनसेसह अनेक पक्षांनी केली आहे. इतर राज्यांतील मंदिरे खुली झाली. मात्र, महाराष्ट्रात अजूनही मंदिरे उघडली नाहीत. राज्यात दारूचे दुकानं सुरू झाले. पण मंदिरं उघडली नाहीत”, अशी टीका आंदोलकांकडून होत आहे.गेली चार महिने टप्प्याटप्प्याने का होईना सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. सर्व बाजारपेठा, भाजीबाजार, मॉल, सर्व दुकाने, बँका, सर्व खासगी सरकारी कार्यालय, कंपन्या, कारखाने सगळेच व्यवस्थित सुरू आहेत. सर्व ठिकाणी प्रचंड गर्दीही ओसंडून वाहत आहे. दसऱ्याला तर व्यायाम शाळा सुरू झाल्या आहेत. परीक्षादेखील घेतल्या जात आहेत. हे सगळे सुरू आहे, तर मंदिरांवर सरकार रोष का?,” असा सवालही आंदोलकांनी उपस्थित केला आहे.

तत्पूर्वी “मॉल्स उघडले जात आहेत, सार्वजनिक कार्यक्रमातील लोकांची उपस्थिती 100 करण्याची परवानगी दिली जात आहे, मग सरकारला मंदिरे उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे?” असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विचारला होता. “सरकारने मंदिरे सगळ्यात शेवट उघडून उगाच नको ते पुरोगामीत्व दाखवू नये. त्यापेक्षा एक नियमावली आखावी आणि हिंदुजनांच्या मंदिर प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा” अशी मागणी त्यांनी केली आहे. “लवकरात लवकर सकारात्मक पाऊल उचललं नाही तर आम्हाला नाईलाजाने सरकारच्या आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल” असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. भाजपचे घंटानाद आंदोलन, वंचित बहुजन आघाडीने पंढरपुरात केलेला विठ्ठल मंदिर प्रवेश आणि एमआयएमच्या आंदोलनानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मंदिर उघडण्याची मागणी करताना दिसत आहे. मंदिर उघडण्याला राज्य सरकारचा मुळीच विरोध नाही. पण त्यापेक्षा लोकांचा जीव महत्त्वाचा आहे. लोकल सुरू केल्यानंतर होणारी गर्दी आटोक्यात आणणं कठीण होत चालले. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सध्या वाढली आहे. कोरोनाची दुसरी लाट आली नसली तरी तिला आमंत्रण देणे परवडणारे नाही. अनेक गोष्टी सध्या बंद ठेवल्या आहेत. त्या सुरू करण्याची मागणी विविध व्यावसायिक संघटना करीत आहेत. पण लोकांचा जीव महत्त्वाचा असल्यानं काही पथ्ये पाळावी लागत आहेत. अशा स्थितीत मंदिर सुरू करणे धोकादायक ठरू शकते. मंदिरे निश्चित उघडली जातील. त्यासाठी थोडी वाट बघावी लागेल. पण दिवाळीनंतर मंदिरं उघडण्याचा शासनाचा विचार आहे”, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.