भारतीय नागरिकांची पाकिस्तानातून सुटका, सोमवारी मायदेशी परतणार!

पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाने याबाबत दिली माहिती

0

नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये अडकलेले 133 भारतीय नागरिक मायदेशी परतणार आहेत. सोमवारी (19 ऑक्टोबर रोजी नागरिक वाघा बॉर्डरवरुन भारतात येतील. पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त कार्यालयानं याबाबत माहिती दिली आहे. उच्चायुक्त कार्यालयाकडून भारतात परतणाऱ्या नागिरकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

भारतीय उच्चायुक्त कार्यालयाने इस्लामाबादमधील उच्च न्यायालयात एक याचिका दाकल केली होती. यामध्ये 4 भारतीय नागरिकांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. चारही नागरिकांच्या शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यामुळं त्यांना भारतात जाण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. सप्टेंबर महिन्यात भारतीय उच्चायुक्त कार्यालयाने ‘363 नो ऑब्जेक्शन टू रिटर्न टू इंडिया’ व्हिसाधारक आणि 37 भारतीय नागरिकांसह एकूण 133 नागरिकांना भारतात परत पाठवणार आहे. पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाने 15 ऑक्टोबरला ट्विट केले होते. त्यामध्ये ‘363 नो ऑब्जेक्शन टू रिटर्न टू इंडिया’ व्हिसाधारक आणि 37 भारतीय नागरिकांना भारतात जाण्याची सुविधा देणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 133 नागरिकांच्या यादीत ज्या भारतीयांचा समावेश आहे, त्यांना 19 ऑक्टोबरला वाघा-आटारी बॉर्डरवर पोहोचण्याचे आदेश भारतीय उच्चायुक्त कार्यालयाने दिले आहेत. यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.