सोपोरमध्ये सुरक्षा जवानांनी केला एका दहशतवाद्याचा खात्मा, मध्यरात्रीपासून चकमक सुरु

0

जम्मू-काश्मीरच्या सोपोर परिसरात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोपोरच्या वारपुरा परिसरात सुरक्षा जवानांनी दहशतवाद्यांना घेरले आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे.

सुरक्षा जवानांना या परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा जवानांनी रात्री दोन वाजेपासून शोध घेण्यास सुरुवात केली. पहाटे सुमारे 4 वाजता चकमक सुरुवात झाली.

या परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून कलम 144 लागू करण्यात आली आहे. या ऑपरेशनमध्ये राष्ट्रीय रायफल्स (आरआर), जम्मू-काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफ जवानांचा सामावेश आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.