करमाड कोरोनाबाधितांची संख्येत सहाने वाढ, एकूण रुग्णसंख्या नऊ

कोरघळमध्ये तीन तर हिवराकरांचा जीव टांगणीला

0

करमाड : करमाड गावात मंगळवारी सर्वाधिक सहा रूग्णाची वाढ झाली. त्यामुळे गावातील एकूण रूग्णांची संख्या नऊवर पोहोचली.. यातील तीन रूग्णांवर घाटीत तर सहा रूग्णांवर बीड रोडवर उभारलेल्या एका कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

करमाड गावात रविवारपासून घोषित केलेल्या लॉकडाऊनची वेळ शुक्रवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत वाढविली.  करमाडप्रमाणेच कोरघळमध्येही रूग्णाची संख्या तीनवर गेली असून तिघांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविल्याने हिवरा गावात धडधड वाढली आहे. या अगाेदर करमाड गावातील एका मोबाईल शॉपीवरील शहराजवळील एका गावातून येणारा कामगार कोरोनाबाधीत निघाला होता. त्यानंतर गावातील पंधरा जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी मोबाईल शॉपी मालकाच्या घरातील दोन व बजाज ऑटोमध्ये काम करणारा एक कामगार, अशा तिघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्यामुळे कोराेना बाधितांची संपूर्ण गल्ली सील केली आहे. सोमवारी बजाज ऑटोमध्ये काम करणा-या कामगाराच्या घरातील सहा जणांचे स्वॅब घेतले असता, ते पाॅझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे गावातील संक्रमितांची संख्या आता नऊवर पोहोचली. या सर्व घडामोडींमुळे करमाड गावातच नव्हे तर पंचक्रोशीत घबराटीचे वातावरण आहे. कारण करमाड हे बाजारपेठेचे गाव असून परिसरातील शेतकरी सामान्य जनतेचा येथेच राबता असतो. मंगळवारी पुन्हा सहा कोरोनाबाधित रूग्णांची भर पडल्याने करमाड ग्रामपंचायतीने शुक्रवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला. तसेच मंगळवारी दोन ट्रॅक्टरच्या साहाय्याने संपूूर्ण गाव, बाजारपेठ, सॅनिटाईझ केले. खबरदारीचा उपााय म्हणून यापूर्वीही गाव सॅनिटाइज केले होते. गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीने दक्षता घेऊन अनेक उपाययोजना केल्या. परंतु हलगर्जीपणा व केवळ सांगितलेल्या उपाययोजनांचा अवलंब न केल्यामुळे गावात कोरोनाचा शिरकाव झाला.

कोरघळ गावातही वाढले संक्रमित 

कोरघळ (ता.औरंगाबाद) येथील एक युवक करमाड येथील मोबाइल शॉपीमध्ये काम करत होता. तो कोरोनाबाधित आढळला.तो रोज कोरघळ येथून करमाडला ये-जा करत होता. म्हणून मंगळवारी त्याच्या घरातील तिघांचे स्वॅब तपासण्यासाठी पाठविले. तीनपैकी दोघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यामुळे कोरघळ या छोटया गावात संक्रमितांची संख्या आता तीनवर गेली आहे.

हिवराकरांचा जीव टांगणीला, वाढली धडधड

हिवरा गावातील चार-पाचशे लोकसंख्या असलेल्या  वीज मंडळात काम करणा-या एका कर्मचा-यास कोरोनाची लक्षणे आढळू लागल्याने मंगळवारी त्याच्यासह घरातील तिघांचे स्वॅब घेण्यात येऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यामुळे या एका छोटयाशा गावात धडधड सुरू झाली आहे.हे गाव करमाड पासुन अवघ्या 3 किमी.वर आहे.तर करमाडपासुन कोरघळचे अंतर 12 किमी आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.