उत्तर प्रदेशात नेपाळच्या तरुणीवर आठवडाभर बलात्काराचा आरोप

उत्तर प्रदेशातून बलात्काराचे आणखी एक प्रकरण पोहोचले महाराष्ट्रात

0

नागपूर : उत्तर प्रदेशातील हाथरस, बलरामपूरमधील बलात्काराचे प्रकरण गाजत असताना आता उत्तर प्रदेशातून बलात्काराचे एक  प्रकरण महाराष्ट्रात पोहोचले आहे. नेपाळच्या एका 22 वर्षीय मुलीला प्रवीण नावाच्या एका तरुणाने लखनौमध्ये डांबून ठेवत एक आठवडा बलात्कार केल्याचा आरोप त्या तरुणीने केला आहे..

उत्तर प्रदेशातील हाथरस, बलरामपूरमधील बलात्काराचे प्रकरण गाजत असताना आता उत्तर प्रदेशातून बलात्काराचे एक  प्रकरण महाराष्ट्रात पोहोचली आहे. नेपाळच्या एका 22 वर्षीय मुलीला प्रवीण नावाच्या एका तरुणाने लखनौमध्ये डांबून ठेवत एक आठवडा बलात्कार केल्याचा आरोप त्या तरुणीने केला. धक्कादायक बाब म्हणजे पीडित तरुणीने त्या तरुणाच्या तावडीतून आपली सुटका करून घेत कसे तरी नागपूर गाठले आणि घडलेल्या प्रकाराची तक्रार महाराष्ट्रातील कोराडी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. नागपूर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आणि उत्तर प्रदेश पोलिसांशी प्राथमिक माहिती घेत  गुन्हा नोंदविला असून पुढील कारवाईसाठी पीडित तरुणीला महाराष्ट्रातील महिला पोलिसांसह उत्तर प्रदेशात रवाना केले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, नेपाळची 22 वर्षीय तरुणी दोन वर्षांपूर्वी नोकरी निमित्ताने भारतात आली होती. आधी नोएडा त्यानंतर लखनऊला तिने नोकऱ्या केल्या. लखनौ मधील तिच्या मैत्रिणीच्या एका मानलेल्या भावासोबत ( प्रवीण ) तिची ओळख झाली. काही दिवसांपूर्वी पैशाच्या देवाण घेवाणीवरून मैत्रिणीसोबत वाद झाल्यानंतर प्रवीणने पीडितेला एका मित्राच्या घरी डांबून ठेवले. त्याकाळात प्रवीणने तिच्यावर अत्याचार करत तिचे पासपोर्ट आणि इतर साहित्य हिसकावून घेतले आणि तिला मारहाण केली. पीडित तरुणीने एक आठवडा अत्याचार सहन केले.. त्यानंतर कसे तरी आपल्या नागपुरातील एका नेपाळी मैत्रिणीसोबत फोनवर संपर्क करत मदत मागितली. त्या मैत्रिणीने तिला लखनऊ ते नागपूर प्रवासासाठी ओला बुक करून दिली. ठरलेल्या वेळी पीडितेने डांबून ठेवलेल्या घरातून आपली सुटका करून घेत पळ काढला आणि ओला ने नागपूर गाठले. नागपुरात आल्यावर तिने कोराडी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.