लॉकडाऊनमध्ये वीजग्राहकांना वाढीव वीजबिलात सवलतीचे निर्देश -नाना पटोले

वाढीव बिलाने नाहक मनस्ताप, ग्राहकांना तूर्तास दिलासा

0

मुंबई : लॉकडाऊन काळात आलेल्या भरमसाठ बिलाचा नागरिकांना नाहक त्रास झाला.  या ग्राहकांना यातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनमध्ये वीजग्राहकांना आलेल्या वाढीव वीजबिलात सवलत देण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत.

आज विधानसभा अध्यक्षांनी लॉकडाऊनमधील वाढीव वीजबिल प्रश्नाबाबत उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. यामध्ये ऊर्जा आणि वित्त विभागाचे अधिकारी, वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते. लॉकडाऊन काळात राज्य सरकारने सांगितले म्हणून लोक घरात थांबली, त्यात त्यांना वाढीव वीजबिल देण्यात आली. त्यामुळे शासनाने या घरगुती ग्राहकांना दिलासा द्यावा, असे निर्देश अध्यक्षांनी दिले.  विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्देशाबाबत वित्तमंत्र्यांशी चर्चा करून दिलासा देण्याचा प्रयत्न करून असे आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी  दिले. त्यामुळे वाढीव बिलाने मनस्ताप झालेल्या ग्राहकांना तुर्तास दिलासा मिळाला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.