धुळ्यात ग्रामपंचायत निवडणुकीत जाऊबाई जोरात, सख्ख्या जावांमध्ये लढा

शिरपूरमध्ये 28 गावांपैकी दहिवद आणि मांडळ येथे दोन जावा एकमेकांविरुद्ध ग्रामपंचायत निवडणुकीत उभ्या

0

धुळे : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात 28 गावांपैकी दहिवद आणि मांडळ येथे दोन जावा एकमेकांविरुद्ध ग्रामपंचायत निवडणुकीत उभ्या आहेत. मोठी जाऊ विरुद्ध लहान जाऊ, अशी लढत येथे पाहायला मिळणार आहे.या निवडणुकीत कोणती जाऊ विजयी होते, हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. मात्र, या जावांमधील रस्सीखेच सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली आहे.

जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा अन्य कोणत्याही स्वराज्य संस्थेची निवडणूक असो. अशा निवडणुकीत दरवेळी आपले नशीब आजमावण्यासाठी आणि निवडणुकीचा दांडगा अनुभव असलेल्या राजकारणी भाऊबंदकीतील व्यक्ती यंदा ग्रामपंचायत निवडणुकीत आहेत. ग्रामपंचायतीतील सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत अजून बाकी असल्याने नात्यातील व्यक्ती यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शिरपूर तालुक्यातील मंडळ येथे प्रभाग क्रमांक 1 ब मधून मोहिनी दिनेश माळी या लहान जावेविरोधात जयश्री गोपाल माळी ही मोठी जाऊ निवडणुकीच्या रिंगणात आहे. दहिवद येथे माजी सरपंच जगन्नाथ भिला पाटील यांची सून वृषाली चुनीलाल पाटील या लहान जावेविरोधात माजी उपसरपंच रवींद्र पाटील यांची पत्नी या नात्याने मोठी जाऊ असलेल्या आशाबाई पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामुळे 18 तारखेला होणाऱ्या मतमोजणीनंतर कोणती जाऊ सरपंच पदी विराजमान होते, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागून आहे.

ग्रामपंचायत निवडणूक

14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात एप्रिल ते डिसेंबरमध्ये या ग्रामपंचायतींची मुदत संपलेली होती. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.  आता या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून, 15 जानेवारीला मतदान होणार आहे, तर 18 जानेवारीला मतमोजणी करण्यात येणार आहे. एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित सुमारे एकूण 14,234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम संगणकीकृत पद्धतीनं राबविणार असल्याचं निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. कोरोनाच्या साथीच्या आजाराच्या संसर्गाची गंभीर परिस्थिती उद्भवल्याने मार्च 2020मध्ये सुमारे 1566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका निवडणूक आयोग्याच्या आदेशानुसार 17 मार्च 2020ला स्थगित करण्यात आल्या होत्या.

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या

ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमदनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.