वडील आणि भाऊ शेतकरी आंदोलनात; मुलींनी शेतात हाती घेतले फावडे अन् कुदळ

कडाक्याच्या थंडीतही 'या' मुली डगमगल्या नाहीत तर धीराने लागल्या कामाला

0

हरियाणा : हरियाणाच्या फतेहाबाद येथील भाटी गावात शेतकरी कुटुंब चळवळीत भाग घेतल्यामुळे अशाच एका कुटुंबातील ही मुलगी  हातात कुदळ आणि फावडे घेऊन  शेतात काम करते. राजधानी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यांमधील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

शेतात काम करणारे वडील आणि भाऊ शेतकरी आंदोलनात सहभागी झाले. तर शेताकडे लक्ष कोण देणार हा प्रश्नच नको. ज्या वयात अभ्यास करायचा, खेळायचे आणि थंडीच्या दिवसांत रजई ओढून झोपायचे वय असलेल्या या दोन मुलींनी मात्र शेतात कामे करण्यासाठी कंबर कसली आहे. हरियाणाच्या फतेहाबाद येथील भाटी गावात शेतकरी कुटुंब चळवळीत भाग घेतल्यामुळे या मुलीने हातात फावड आणि कुदळ घेऊन कडाक्याच्या थंडीतही काम करायला सुरुवात केली.आपले वडील आणि मोठे पुरुष घरी नाहीत. ते आंदोलनात आपल्याच हक्कांसाठी लढत आहेत. तर शेतीकडे दुर्लक्ष नको म्हणून शेतकर्‍यांची मुले शेती हाताळत आहेत. या जबाबदारीत केवळ मुलेच नव्हे तर मुलीही सिंचनापासून शेतापर्यंत इतर कामे करत आहेत.  फतेहाबाद गावातील अनेक मुली फवडे आणि कुदळ घेऊन शेतात काम करत असल्याचे दिसत आहे. त्यांचे वडील आणि भाऊ शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आहेत. सिंचनापासून ते शेताला खत देण्यापर्यंत सगळी कामे या मुली करत आहेत. कडाक्याच्या थंडीतही या मुली डगमगल्या नाहीत तर धीराने कामाला लागल्या. शेतात काम करणाऱ्या विणा, राणी म्हणतात की, आमचे वडील आणि भाऊ जरी आंदोलनासाठी गेले असले तरी शेतात दुर्लक्ष करून चालणार नाही. पिकाची काळजी घ्यायला हवी आणि ते खराब होऊ नये, त्यांची मेहनत वाया जाऊ नये, यासाठी आम्ही हे करत आहोत.या मुलीच नाही तर घरातील इतर महिलादेखील त्यांना या कामांमध्ये मदत करत आहेत. या मुली आणि महिलांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. आपले घरातील काम करून या महिला शेतीकडेही तेवढेच लक्ष देत आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.