पुण्यात आंंबट शौकिनांना जाळ्यात अडकून, ब्लॅकमेलचा प्रकार उघडकीस
सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी महिलांशी मैत्री पडली महागात
पुणे : सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी महिलांशी मैत्री पुण्यातील अनेकांना चांगलीच महागात पडली, काही पुरुषांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून हजारो रुपये उकळण्याचा धंदाच काही महिला करत असल्याचे उघडकीस आले आहे. फेसबुक असो वा डेटिंग साईट्स. ऑनलाईन मैत्रीचा हा फंडा पुण्यातील अनेक जणांना डोकेदुखी ठरला आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या पुरुषांना काही माहिलांडून हजारोंचा गंडा घातला जात असल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. फ्रेंडशिप केल्यानंतर अश्लील व्हिडीओज तसेच ऑडिओ कॉल रेकॉर्ड करुन तरुणांना ब्लॅकमेल करण्याचा उद्योग या माहिलांकडून सुरू आहे. यासंदर्भात आतापर्यंत आठ जणांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या आरोपी महिलांना अजूनही अटक झालेली नाही. तसेच अशा महिलांचा पोलिस शोध घेत आहेत.. आमच्याकडे काही फसवणूक झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्याचा तपास केला जात आहे, अशी माहिती सायबर सेलचे पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी दिली. ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेची मोडस ऑपरेंडी खतरनाक आहे. ती आधी मैत्री करायची. नंतर स्वत:चे नग्न व्हिडिओज तरुणांना पाठवायचे. काही दिवसांनंतर व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल करुन स्वतः नग्न व्हायची आणि त्या तरुणांनादेखील नग्न व्हायला सांगायची. ते व्हिडिओकॉल एका अॅपद्वारे रेकॉर्ड केले जायचे. त्यानंतर ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन संबंधित तरुणांना ब्लॅकमेल करुन पैशांची मागणी करायची, अशा प्रकारे ब्लॅकमेल करणाऱ्या महिलांचं मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता आहे. आतापर्यंत सात ते आठ तक्रारी पोलिसात आल्या आहेत, मात्र अशी फसवणूक झाली असेल तर न घाबरता पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहन सायबर शाखेने केले आहे.