मराठवाड्यात आठही जिल्ह्यांत किमान तापमान घसरल्याची नोंद
औरंगाबाद, नांदेड, जालना, उस्मानाबाद, बीड येथे किमान तापमान कमी झाल्याने वाढला गारठा
औरंगाबाद : नोव्हेंबरमध्ये बंगालचा उपसागर व अरबी समुद्रावर कमी हवेचा दाब निर्माण झाला होता. समुद्राच्या भूपृष्ठ भागातील पाण्याचे तापमान वाढून अरब समुद्रावरून बाष्पयुक्त वारे वाहिले. परिणामी नोव्हेंबरमध्ये ढगाळ वातावरण राहिले. बाष्पयुक्त वाऱ्याचा जोर ओसरत असून उत्तरेकडील शीत वाऱ्याचा जोर वाढत आहे. हवेचा दाब जसजसा जास्त होईल तसा थंडीचा कडाका वाढणार आहे. रविवारी परभणीचे किमान तापमान प्रथमच ७ अंश सेल्सियसवर गेल्याची नोंद केली गेली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी हवामान सेवा केंद्रात ही नोंद घेण्यात आली. तर भारतीय हवामान केंद्राने १०.६ अंशांवर पारा गेल्याचे स्पष्ट केले आहे. औरंगाबाद, नांदेड, जालना, उस्मानाबाद, बीड येथे किमान तापमान कमी झाल्याने गारठा वाढला आहे.
दिवसाच्या तापमानातदेखील २ अंशांनी घट होऊन ते २८ ते ३० अंशादरम्यान होते. शीत वाऱ्याचा जोर वाढणार असल्याने पारा नीचांक पातळीवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नोव्हेंबरमध्ये बंगालचा उपसागर व अरबी समुद्रावर कमी हवेचा दाब निर्माण झाला होता. समुद्राच्या भूपृष्ठ भागातील पाण्याचे तापमान वाढून अरब समुद्रावरून बाष्पयुक्त वारे वाहिले. परिणामी नोव्हेंबरमध्ये ढगाळ वातावरण राहिले. हलका पाऊस झाल्याने बदलत्या वातावरणामुळे थंडीत दीर्घ खंड पडला. आता बाष्पयुक्त वाऱ्याचा ओघ ओसरला आहे. तर उत्तरी वाऱ्याचा वेग वाढतोय. परिणामी तापमानात पुन्हा वेगाने घसरण सुरू झाली आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यंाचे १९ ते २० अंशांवर पोहोचले किमान तापमान आता १०.६ ते १४ अंशांपर्यंत तर कमाल ३२ ते ३० अंशांवरून २८ ते ३० अंशांपर्यंत म्हणजे रात्रीच्या तापमानात ८.४ ते ५ आणि दिवसाच्या सरासरी २ अंशांनी घसरण झाली आहे. परभणीत ४ डिसेंबरला ९.४, ५ रोजी ८.८, ६ डिसेंबरला ८.५, ७ राेजी ८.१, ८ डिसेंबरला ७.० एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर शनिवारी १२.३ अंश सेल्सियस किमान तापमान होते. त्यात पाच अंशाने घट होऊन ते ७ अंश सेल्सियस झाल्याची नोंद कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी हवामान सेवा केंद्रात झाली आहे. थंडीचा कडाका वाढला असला तरी शीत, उष्ण, बाष्पयुक्त वाऱ्याचा आकाशात संगम होईल व अंशत: ढगाळ वातावरण काही दिवस राहिल. शीत वाऱ्याचा जोर वाढला तर दिवस रात्रीच्या तापमानात घट होऊन कडाका वाढेल.