महाराष्ट्रात डॉक्टर, नर्स मिळत नसल्याने इतर राज्यांतही जि. प ची जाहिरात

पुण्यात आरोग्य विभागाची मेगाभरती

0

पुणे : डॉक्टर, नर्स आणि आरोग्यसेविका पदांसाठी आता महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांमध्ये पुणे जिल्हा परिषद जाहिरात देणार आहे . पुणे जिल्हा परिषद ही एकमेव जिल्हा परिषद बाहेरच्या राज्यात जाहिरात करणार असल्याची माहिती उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी दिली .

कोरोनामुळे पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने ग्रामीण भागात अद्याप आरोग्याच्या विविध पदांचा मोठा बॅकलॉग तयार झाला आहे. शासनाने पुणे जिल्हा परिषदेसाठी डॉक्टर, नर्स, आरोग्यसेविका, वॉर्डबॉयसह औषध निर्माता, भूलतज्ज्ञ अशी विविध सुमारे 1774 पदे मंजूर केली आहेत. मंजूर केलेली पदे भरण्यासाठी जिल्हा परिषदेने अनेक वेळा संपूर्ण महाराष्ट्रात जाहिरात दिली. तीन-चार वेळा जाहिरात दिल्यानंतर 1132 पदे भरण्यात जिल्हा परिषदेला यश मिळाले आहे. परंतु स्टाफ नर्स, आरोग्यसेविका आणि डॉक्टर हीच प्रमुख पदे अद्यापही मोठ्या प्रमाणात रिक्‍त आहेत. ही पदे भरण्यासाठीच राज्याबाहेरही आता जाहिरात केली जाणार आहे. नर्सची 299 आणि डॉक्टरांची 260 अशी एकूण 582 पद रिक्त आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.