जम्मूत नगरोटामध्ये सुरक्षारक्षकांनी जैशच्या चार दहशतवाद्यांना कंठस्नान

दहशतवादी जम्मूहून श्रीनगरकडे ट्रकमध्ये दारूगोळा घेऊन जात असता सुरक्षादलांनी उडवला ट्रक

0

श्रीनगर : जम्मूच्या नगरोटामध्ये सुरक्षा रक्षकांनी आज सकाळी जैशच्या चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.  हे चार दहशतवादी ट्रकमध्ये दारूगोळा घेऊन जम्मूहून श्रीनगरकडे जात होते. सुरक्षादलांना त्यांची माहिती मिळाली असता, नगरोटा येथील टोलनाक्यावर त्यांना अडवण्यात आले. सुरक्षारक्षकांनी त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले. मात्र त्यांनी सुरक्षादलांवर ग्रेनेडचा हल्ला केला.

जम्मूहून श्रीनगरकडे  हे चार दहशतवादी ट्रकमध्ये दारूगोळा घेऊन जात होते. सुरक्षादलांना त्यांची माहिती मिळाली असता, नगरोटा येथील टोलनाक्यावर त्यांना अडवण्यात आले. सुरक्षारक्षकांनी त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले. मात्र त्यांनी सुरक्षादलांवर ग्रेनेडचा हल्ला केला.यानंतर सुरक्षादलांनी ट्रकच उडवून दिला आणि दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले. खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद करण्यात आला आहे. तीन दिवसांपूर्वीच दिल्लीमध्ये जैशच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. सोमवारी रात्री दिल्लीतील पोलिसांच्या विशेष सेलने दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. दोघांकडून काही महत्त्वाची कागदपत्रे आणि स्फोटके जप्त केली आहेत. अटक केलेले दोन्ही दहशतवादी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित आहेत. दोघेही जम्मू काश्मीरमधील बारामुला आणि कुपवाडा येथील आहेत. त्यांची व्हॉट्सअप ग्रुपवर पाकिस्तानशी चर्चा करत होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.