बिहारमध्ये दुसऱ्याची बायको पळवून आणली, राज्यात अक्षता पडायच्या आधीच पळाली नवरी!

विजय वडेट्टीवार यांनी भाजप नेते रावसाहेब दानवे यांना कोणाचाही बाप काढायचा अधिकार नाही!

0

नागपूर : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजप नेते केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. दानवेंना कोणाचाही बाप काढायचा अधिकार नाही, असे प्रत्युत्तर वडेट्टीवार यांनी दिले.

लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार बिहारमध्ये 2015 पासून सत्तेत होते. भाजपने  बिहारमध्ये 2017 मध्ये नितीशकुमार यांच्यासोबत सत्ता स्थापन केली होती. हा धागा पकडत विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला. “बिहारमध्ये गेल्या वेळी दुसऱ्याची बायको पळवून आणली होती. राज्यातही सकाळी सकाळी गुपचूप लग्न केले होते, मात्र, संसार टिकला नाही, अक्षदा पडायच्या आधीच नवरी पळाली,” अशा शब्दात वडेट्टीवारांनी दानवे आणि भाजपवर सडकून टीका केली.  भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांनी एका सभेत राज्य सरकारला ‘चोरून लग्न केले, संसार थाटला, मग बापाला पैसे का मागता, असे वक्तव्य केले होते. औरंगाबाद येथे गुरुवारी झालेल्या सभेतही दानवे यांनी ” हे मोदींकडे पैसे मागतात मी इतकेच म्हणालो की, चोरून संसार तुम्ही करता, पैसे बापाकडे मागता. आता आमच्याकडे कशाला पैसे मागता, तुमचे सरकार म्हणजे तुमची जबाबदारी आहे” असे टीकास्त्रही त्यांनी ठाकरे सरकारवर सोडले होते. दानवे यांच्या या वक्तव्याचा विजय वडेट्टीवार यांनी चांगलाच समाचार घेतला विजय वडेट्टीवार यांनी “केंद्राचा निधी म्हणजे त्यांच्या बापाचे पैसे आहेत का?, त्यांच्या बापाने कमवून ठेवले का?”,असा प्रश्न दानवे यांना केला. “रावसाहेब दानवे येऊन जाऊन बाप काढतात, दानवे यांना विचारा त्यांचे बाप कोण आहे, कोणाचे बाप, किती बाप?”, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. “केंद्र सरकार राज्याला मदत करते म्हणजे उपकार करत नाही, तो आमचा हक्क आहे, एनडीआरएफ च्या निकषावर मदत दिलीच पाहिजे, दानवे यांना निकष माहीत नाहीत का? असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी विचारला.मात्र, संसार टिकला नाही, अक्षता पडायच्या आधीच नवरी पळाली,” अशा शब्दात वडेट्टीवारांनी दानवे आणि भाजपवर सडकून टीका केली.

उद्धव ठाकरे आणि रावसाहेब दानवे यांच्यात आरोप प्रत्यारोप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली होती. “तुम्ही लग्न केले आणि आता बापाकडे पैसे कशाला मागता,” या रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र सोडले होते.” माझा बाप केंद्रात नाही. तो भाडोत्री बाप तुम्हालाच लखलाभ असो. माझा बाप महाराष्ट्रच हाच आहे, माझ्या विचारातून आणि कृतीतून वेळोवेळी त्याचे अस्तित्व तुम्हाला दिसून येईल”, असे उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले होते. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील टीकेवर रावसाहेब दानवे यांनी औरंगाबादमध्ये पलटवार केला होता. “राजकारणात फादर आणि गॉडफादर लागतो, माझा गॉडफादर दिल्लीत आहे’, असे म्हणत भाजपाचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.