औरंगाबादेत कोरोनाग्रस्त आजीला सोडले जंगलात, निर्दयी नातेवाईक फरार

माणुसकीच्या नावावर काळिमा फासणारी घटना

0

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजूबाजूला अनेक बदल घडत आहेत. काहींवर बेरोजगारीची वेळ आली आहे, तर अनेकांचे उद्योग ठप्प झाले. मात्र, अशाही स्थितीत नागरिक या आव्हानाचा सामना करत आहेत. दुसरीकडे अशीही उदाहरणे समोर येत आहेत जी माणुसकीच्या नावावर काळिमा फासणारी आहेत. औरंगाबादमध्ये असाच एक प्रकार समोर आला. औरंगाबादमध्ये एका 90 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह आजीबाईंना त्यांच्या नातेवाईकांनीच जंगलात सोडून दिले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. आजीला जंगलात सोडून पळून गेलेल्या नातेवाईकांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लवकरच या नातेवाईकांना अटक होण्याची शक्यता आहे.
औरंगाबादमधील कच्चीघाटी परिसरात काही नातेवाईकांनी आपल्या 90 वर्षीय कोरोनाबाधित आजींना थेट जंगलात सोडले. जर्जर म्हाताऱ्या आजींना जंगलात टाकून संबंधित नातेवाईक फरार आहेत. या आजींना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारानंतर मरणासन्न अवस्थेत जंगलात सोडण्यात आलेल्या आजींची प्रकृती आता स्थिर आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.