सिडको बसस्टँडजवळ भीषण अपघात, बस सिग्नलवर उभ्या दुचाकीला जोरदार धडकली

एक जण जागीच ठार, एक गंभीर जखमी, रुग्णवाहिका न आल्याने ऑटोतून घाटीत, नागरिक संतप्त

0

औरंगाबाद  : शहरातील सिडको बस स्टँडजवळ भीषण अपघात झाला आहे. बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये एक जणजागीच ठार  तर एक गंभीर जखमी आहे. त्याला घाटी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

भरधाव वेगाने येणाऱ्या बसने धडक दिल्यानंतर उपस्थित लोकांनी संतप्त होऊन बसच्या काचा फोडल्या. मंगळवारी दुपारच्या सुमारास सिडको बस स्टँडजवळ भीषण अपघात झाला. सिडको बस स्थानकातून बस निघाली होती. दरम्यान सिग्नलवर उभ्या दुचाकीला बसने धडक दिली. बसचा वेग जास्त होता. यावेळी बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकीला जोरदार धडक बसल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारांसाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुभम शिंदे असे मृत तरुणाचे नाव आहे.

रुग्णवाहिका न आल्याने ऑटोतून नेले घाटीत, नागरिक संतप्त
अपघात एवढा भीषण होता की, एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. सिग्नलवर उभ्या असलेल्या दुचाकीला उडल्यानंतर उपस्थित नागरिक संतप्त झाले आणि त्यांनी बसच्या काचा फोडल्या. दरम्यान घटनास्थळी लवकर रुग्णवाहिका न आल्याने दोघांनाही ऑटो रिक्षाने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.