मुख्यमंत्र्यांच्या आजच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जनतेशी साधला संवाद

0

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. लॉकडाऊन दरम्यान लोकांना आलेल्या वाढीव वीजबिलांवरुन विरोधक टीका करत आहेत. राज्यातील जनता ही नाराज आहे. मनसेने सरकारला इशारा दिला आहे. तसेच मोर्चा देखील काढणार आहे. या मुद्द्यांना मुख्यमंत्री आपल्या भाषणातून हात घालतील, अशी अपेक्षा होती. पण त्यांचे आजचे भाषण हे कोरोनाच्या काळजी संदर्भातील होते.

देशातील इतर राज्यांमध्ये कोरोना वाढता धोका पाहता, अनेक शहरांमध्ये रात्री कर्फ्यू लागू आहे. मुंबईवरही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका आहे. या पार्श्वभुमीवर हा संवाद महत्वाचा मानला जातो. कोरोनाचे संकट अद्याप टळले नाही. त्यामुळे गाफील राहू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी जनतेला केले.

भाषणातील महत्वाचे मुद्दे 

दुसरी लाट ही त्सुनामी आहे का अशी भीती वाटते. आपली आरोग्य यंत्रणा, पोलिस यंत्रणा सज्ज आहे. पण त्यांच्यावर किती ताण द्यायचा? हा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांना सहकार्य करणे हे आपले काम आहे.  सर्वकाही खुले केले म्हणजे कोरोना गेला असे समजू नका. गर्दी झाली तर कोरोना मरणार नाही तर कोरोना वाढणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना कोरोना घातक ठरतो. आताच्या लाटेत तरुणांनादेखील संक्रमण होत आहे. हे फार गंभीर आहे. लक्षणांकडे दुर्लक्ष करुन तरुण घरी वावरले तर ज्येष्ठांना त्रास होणार. अद्यापही लस हातात आली नाही. राज्यात १२ ते साडेबारा कोटी जनता आहे. यात पहिला आणि दुसरा डोस द्यावा लागेल. याचा अर्थ २४ कोटी डोस द्यावे लागणार आहेत. लस कोणत्या तापमानात ठेवायची? कशी ठेवायची हे प्रश्न सध्या अनुत्तरीत आहेत. तोपर्यंत ‘मास्क घाला, हात धुवा, अंतर पाळा’ हीच त्रिसूत्री पाळायला हवी.  कोविड होऊन गेल्यानंतर त्याचे दुष्परिणाम होत आहेत. पोस्ट कोविड हे गंभीर आहे.  अनावश्यक ठिकाणी जाऊ नका, गरज नसेल तर घराबाहेर पडू नका आणि लक्षणे वाटली तर चाचणी जरुर करुन घ्या, असे आवाहन  केले. वॅक्सिन येईल तेव्हा येईल. कोरोनापासून चार हात लांब राहा.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.