हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा…! उद्धव ठाकरेंनी विरोधकांना दिला इशारा

आम्ही तुमच्यासारखे गुळाच्या ठेपेला चिटकणारे मुंगळे नाही,वाटेला जाल तर मुंगळा कसा डसतो ....

0

मुंबई  : राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान करण्याचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार झाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच दसरा मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधित करणार आहे.

 शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान करण्याचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार झाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच दसरा मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधित करत आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात केवळ 50 जणांच्या उपस्थितीत पार पडत आहे. कोरोना संकटामुळे दरवर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्कात करण्याची परंपरा खंडीत होत आहे. आज सोशल डिस्टस्टिंगचे सर्व नियम पाळून हा दसरा मेळावा पार पडत आहे. आता यामध्ये शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात झाली. हे सरकार लवकरच पडेल, असे म्हणणाऱ्यांवर त्यांनी निशाणा साधला आहे. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाच, आम्ही तुमच्यासारखे गुळाच्या ठेपेला चिटकणारे मुंगळे नाही, असे ते म्हणाले. ‘अनेक जण तारीख पे तारीख देतात. अनेक जण सरकार पाडण्याचे स्वप्न बघतात. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाच, आम्ही तुमच्यासारखे गुळाच्या ठेपेला चिटकणारे मुंगळे नाही. जर वाटेला जाल तर मुंगळा कसा डसतो हे दाखवल्याशिवाय राहणार नाही. मी वाघाची औलाद आहे, त्याला जर डिवचले तर काय होते ते त्याचे  इतिहासात दाखले आहे. ‘ असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना दिला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.