लॉकडाऊनमध्ये तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी, परमीटची व्हॅलिडीटी संपली असेल तर…

३१ मार्च २०२१पर्यंत वाढवली ड्रायव्हींग लायसन्स, आरसी, परमीट नूतनीकरणाची तारीख

0

नवी दिल्ली :  वाहन नोंदणी,  ड्रायव्हिंग लायसन्स आणि फिटनेस प्रमाणपत्र अशा अनेक महत्त्वाच्या वाहन कागदपत्रांवर केंद्र सरकारने पुन्हा एकदा सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता कोणतीही व्यक्ती ३१ मार्च २०२१ पर्यंत अशी कागदपत्रे वापरू शकते, ज्यांची वैधता १ फेब्रुवारी २०२० रोजी संपली आहे.

वाहन नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स आणि फिटनेस प्रमाणपत्र, अशा अनेक महत्त्वाच्या वाहन कागदपत्रांवर केंद्र सरकारने पुन्हा एकदा सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता कोणतीही व्यक्ती ३१ मार्च २०२१ पर्यंत, अशी कागदपत्रे वापरू शकते, ज्यांची वैधता १ फेब्रुवारी २०२० रोजी संपली आहे. लॉकडाऊनच्या काळात तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी, परमीटची व्हॅलिडीटी संपली असेल तर ही बातमी महत्वाची आहे. ड्रायव्हींग लायसन्स, आरसी, परमीट नूतनीकरणाची तारीख ३१ मार्च २०२१पर्यंत वाढवण्यात आली आहे.  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने कोरोना साथीमुळे चौथ्यांदा आपली वैधता वाढविली आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये सरकारने ही वैधता ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढविली. मंत्रालयाने रविवारी सांगितले की, या निर्णयामुळे नागरिकांना सुरक्षित शारीरिक अंतर राखत वाहतुकीसंदर्भातील सेवा मिळण्यास मदत होईल. अनेकांना ऑनलाईनद्वारे अर्ज केल्यानंतर महिन्यानंतरची तारीख मिळाली होती. हा सर्व त्रास लक्षात घेत केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने ही मुदत तीन महिन्यांनी पुन्हा वाढविली आहे. केंद्र सरकारच्या नव्या निय़मांनुसार जर ड्रायव्हिंग लायसन नसेल तर ५००० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. वैधता संपलेले ड्रायव्हिंग लायसन म्हणजेही विना लायसन मानण्यात येते.

फास्ट टॅगची सक्ती

तसेच देशातील प्रत्येक वाहनाला १ जानेवारीपासून फास्ट टॅगची  सक्ती असणार आहे. तशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. फास्ट टॅगमुळे टोलच्या रांगेतून मुक्ती मिळणार आहे. देशातील प्रत्येक वाहनाला १ जानेवारीपासून फास्ट टॅग असणे बंधनकारक करण्यात आले. केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. फास्ट टॅगची सक्ती केल्यानंतर वाहनांना टोलनाक्यांवर रोख रकमेने टोल भरावा लागणार नाही. यामुळे वाहनाचे इंधन आणि प्रवाशांचा वेळ दोन्ही गोष्टी वाचणार आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.