‘सरकारने ‘ईडब्ल्यूएस’चे आरक्षण दिले नाही तर शिवसंग्राम न्यायालयात जाणार’- विनायक मेटे

सरकारची निष्क्रियता आणि त्यातील काही मराठा समाजाचे मंत्री यांच्यामुळे ही वेळ आल्याचा आरोप

0

रत्नागिरी : मराठा आरक्षणावरून शिव संग्रामचे नेते विनायक मेटे  यांनी थेट सरकारला इशारा दिला आहे. जर मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएसचं आरक्षण दिले नाही तर शिवसंग्राम  न्यायालया त जाईल, असा इशारा विनायक मेटे यांनी दिला आहे.

यावेळी त्यांनी सरकार आणि काही नेत्यांवरही टीका केली. मराठा आरक्षण स्थगितीचा फटका मेडिकल प्रवेशावर झाला आहे. यामुळे आर्थिक मागास दुर्बल घटकाचे म्हणजेच ईडब्ल्यूएसचे राज्य सरकारकडून आरक्षण मिळावे ही मागणी समोर येत आहे. जर हे आरक्षण दिले असते तर मराठा समाज्याची जवळपास 600 मुले मेडिकल प्रवेशापासून वंचित राहिली नसती. जे नुकसान झालं त्याला सरकारची निष्क्रियता आणि सरकारमधील काही मराठा समाज्याचे मंत्री यांच्यामुळे ही वेळ आल्याचा आरोप संग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केला आहे. यावेळी सरकारने जर ईडब्ल्यूएसचे आरक्षण दिलं नाही तर शिवसंग्राम  न्यायालया त जाईल, असा इशाराही विनायक मेटे यांनी दिला आहे. ओबीसी आणि मराठा समाजात तेढ कशी निर्माण होईल हे पाहण्याचे काम सत्ताधारी पक्षातील आणि सरकारमधील काही मंत्री करत असल्याचा आरोपही विनायक मेटे यांनी केला आहे. जे आऊटडेटेड झालेले नेते आहेत त्यांना पुढे करून सरकारमधील विजय वडेट्टीवारांसारखे नेते हे काम करत असल्याचा थेट आरोप विनायक मेटे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

वीजबिलावरून सरकारवर आरोप

वाढीव वीजबिल देऊन सरकारने सर्वसामान्यांच्या खिशावर डाका घातला, याचा आम्ही निषेध करतो. शंभर युनिट वीज आम्ही मोफत देऊ, असे आश्वासन देण्यात आले होते. ही घोषणा लांबच राहिली मात्र, अशा पद्धतीने वाढीव वीजबिल देणे अतिशय चुकीचं असल्याचे विनायक मेटे यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, ‘गोरगरिबांनी वीज वापरलीच नाही. त्यांना मात्र, भरमसाठ बिले पाठवली आणि जे मंत्री भरमसाठ वीज वापरतात त्यांना वीजबिल नाही’ हा दुजाभाव सरकार करत असल्याचा आरोप विनायक मेटे यांनी केला. तसेच या प्रकरणी शिवसंग्रामसुद्धा आंदोलन छेडणार असल्याचा इशारा विनायक मेटे यांनी दिला आहे. या बाबत दोन दिवसांत उर्जा मंत्र्यांशी आमची बैठक असल्याची माहिती विनायक मेटे यांनी दिली.

‘गोंधळलेले  महाविकास आघाडी सरकार’

कोरोनाची दुसरी लाट येऊ नये, यासाठी सरकारकडून सूचना करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे कोव्हिड सेंटर्स बंद करण्याचा सपाटा महाविकास आघाडी सरकारने लावला आहे. म्हणजे सरकारचे काय चालले आहे हेच कळंत नाही. धोरण निश्चित नाही, निर्णय निश्चित नाही, त्यावरील अंमलबजावणी नाही. त्यामुळे हे गोंधळलेले सरकार असल्याची टीका शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.