आयएएस टॉपर टीना दाबी आणि अतहर अडकले लग्नगाठीत

0

2015 मध्ये आयएएस टॉपर झालेली टीना दाबी आणि अतहर आमीर-उल-शफी खान शनिवारी लग्नगाठीत अडकले आहेत. दोघांनी काश्मिरमधील पहलगाममध्ये डेस्टिनेशन वेडिंग केले. दोघांच्या लग्नासाठी नातेवाईक आणि जवळचे मित्र परिवार उपस्थित होते.

लग्नानंतर दोघे दक्षिण काश्मिरमधील अनंतनागमधील देवपूरा मत्तान या खान कुटुंबाच्या गावी रवाना झाले. दोघांचा गेल्या 2 आठवड्यापूर्वीच साखरपुडा झाला होता. टि्वटरवर त्यांच्या लग्नाचे फोटो अपलोड केले आहेत.

2015 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थातच यूपीएससी स्पर्धेत भारतात पहिली आलेली टीना आणि याच परिक्षेत दुस-या क्रमांकावर आलेला अजहरचे आयएएसच्या प्रशिक्षणावेळी प्रेमसुत जुळले होते. याआधीसुद्धा टीनाने त्यांच्या लग्नाविषयी माहिती दिली होती.

टीना दलित समाजाची असून अतहर काश्मिरी मुसलमान आहे. टीनाने अतहरसोबतचे फोटो पोस्ट केल्यानंतर त्यांच्यावर टिकेची झोड उडाली होती.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.