आयएएस अधिकारी सुधाकर शिंदे यांचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू

नांदेडमध्ये सुधाकर शिंदेंच्या मृत्यूने शोककळा, परिवाराचा योग्य उपचार न मिळाल्याचा आरोप

0

परभणी :  त्रिपुरा कॅडर 2015 च्या आयएएस बॅचचे आयएएस अधिकारी सुधाकर शिंदे यांचा कोरोनाने पुणे येथे उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू झाला. मात्र त्यांना नांदेड येथे रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिथे जसे पाहिजे तसे उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे आम्हाला मोठी शिक्षा भोगावी लागल्याचा गंभीर आरोप सुधाकर शिंदे यांचे बंधू ज्ञानेश्वर शिंदे यांनी केला आहे.

35 वर्षीय आयएएस अधिकारी सुधाकर शिंदे सुट्टी असल्याने दोन आठवड्यांपूर्वी कुटुंबीयांसह गावी आले होते. परभणीच्या पालम तालुक्यातील उमरा गावात त्यांचे वडील चार भाऊ राहतात.  गावी आल्यावर ते शेतातील विहिरीत पोहण्यास गेले आणि त्यानंतर त्यांना सर्दी आणि ताप येत होता. त्यानंतर त्यांची अचानक तब्येत बिघडली आणि त्यांना नांदेड येथील गुरुगोविंदसिंग शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती खालवल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परिवाराने त्यांना औरंगाबाद येथे हलवण्याचा निर्णय घेतला. औरंगाबादवरून पुणे येथील रुबी हॉल क्लिनिकला त्यांना हलवण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सुधाकर शिंदे हे त्रिपुरा येथे अर्थ मंत्रालयात सचिव पदावर कार्यरत होते. सन 2015 च्या बॅचमध्ये त्यांची आयएएस अधिकारी म्हणून निवड झाली होती. त्यांचं शालेय शिक्षण परभणी येथील नवोदय विद्यालयात झाले. त्यानंतर औरंगाबाद येथून महाविद्यालय शिक्षण पूर्ण करून ते पुणे व नंतर दिल्ली येथे युपीएससी परीक्षा देण्यासाठी गेले आणि 2015 मध्ये आयएएस अधिकारी झाले. त्यांच्या पश्चात त्यांच्या पश्चात वडील चार भाऊ तीन बहिणी पत्नी व तीन वर्षाची मुलगी असा मोठा परिवार आहे. शिंदे कुटुंबातून आरोग्य व्यवस्थेवरील रोष व्यक्त केला जात आाहे. शिवाय गावकऱ्यांनीही कोरोनाचे रुग्ण किंवा इतर रुग्ण हे परभणीत राहून व्यवस्थित नीट होत आहेत. मात्र नांदेडच्या एवढ्या मोठ्या रुग्णालयात जाऊन देखील त्या ठिकाणी शिंदे  का बरे झाले नाहीत, असा सवाल केला जात आहे.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.