”मी कृषी क्षेत्राच्या विकासाआड येणाऱ्या सर्व भिंती पाडतो” – पंतप्रधान मोदी

भारत बंदनंतर आता शेतकरी आंदोलन आणखी पेटणार

0

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्या विरोधात आंदोलन करणारे शेतकरी आता आपला लढा आणखी तीव्र करण्याच्या तयारीत आहेत. भारत बंदनंतर आता शेतकरी आंदोलन आणखी पेटणार असल्याचे दिसत आहे.

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्या विरोधात आंदोलन आता आपला लढा आणखी तीव्र करण्याच्या तयारीत आहेत. भारत बंदनंतर आता शेतकरी आंदोलन आणखी पेटणार. कारण  बलबीर, भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष बलबीर, एस.राजेवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार 12 डिसेंबर रोजी दिल्ली- जयपूर रस्ता रोखण्यात येणार आहे. इतकेच नाही तर उपजिल्हाधिकारी कार्यालये, भाजपा नेत्यांच्या घरांसमोर निदर्शनेदेखील करण्यात येणार आहे. यावेळी टोल प्लाझादेखील रोखण्यात येईल. यामध्ये केएमसी नेत्यांच्या अंदाजाप्रमाणे 30,000 शेतकरी ट्रक-ट्रॉलीसह दाखल होणार आहेत. दुसरीकडे कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी पंजाबच्या सात जिल्ह्यांमध्ये सुमारे एक हजार गावांतून 1,500 हून अधिक वाहने येणार आहेत. त्यपैकी 1,300 ट्रॅक्टर-ट्रॉली दिल्लीकडे येणार आहे. किसान मजदूर संघर्ष समितीने दिलेल्या माहितीनुसार, पंजाब आंदोलकांनी त्यांचा एक नवीन काफिला तयार केला आहे. जो रविवारी दिल्लीच्या सीमेपर्यंत दाखल होणार आहे. दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एफआयसीसीआय च्या 93 व्या वार्षिक बैठकीचे व्हर्च्युअल पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. यावेळी संबोधित करताना त्यांनी कृषी कायद्यांसह अनेक मुद्यांवर भाष्य केले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.