…मराठा आरक्षणासाठी रथीमहारथींना साष्टांग नमस्कार घालेन: उदयनराजे भोसले

राज्यातील वडिलधाऱ्या माणसांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले पाहिजे!

0

सातारा : मराठा आरक्षणाला प्रश्न सोडवण्यासाठी वेळ पडल्यास मी रथीमहारथींना साष्टांग नमस्कार घालायला तयार आहे, असे वक्तव्य भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले  यांनी केले. तसेच आरक्षण हे गुणवत्तेनुसारच मिळाले पाहिजे, या भूमिकेचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

वेळ आल्यावर मी मराठा आरक्षणावर जाहीरपणे बोलेन. मात्र, राज्यातील वडिलधाऱ्या माणसांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. उदयनराजे यांच्या या वक्तव्याचा रोख शरद पवार यांच्या दिशेने होता. सर्वोच्च न्यायालयात 9 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली होती. नोकरी आणि शैक्षणिक आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे राज्यातील मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आरक्षण हे गुणवत्तेनुसारच मिळायला पाहिजे, या भूमिकेवर आपण अजूनही ठाम असल्याचे सांगितले. तसेच योग्यवेळी मी मराठा आरक्षणावर जाहीरपणे बोलेन, असेही त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच मराठा ठोक क्रांती मोर्चाचे नेते आबा पाटील यांनी शरद पवार यांना मराठा आरक्षणाच्या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केली होती. शरद पवार यांनी राज्यात तीन पक्षांना एकत्र आणत महाविकासआघाडीचे सरकार स्थापन केले. त्याप्रमाणेच पवार यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्नही सोडवावा, अशी मागणी आबा पाटील यांनी केली होती. यासाठी लवकरच मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली होती.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.