सण, उत्सवात आरोग्यदायी वातावरण केल्यास मी अभिमाने गावकऱ्यांचा सत्कार करेल!

शांतता बैठकीत सहायक पोलिस निरीक्षक अर्चना पाटील यांचे नागरिकांना आवाहन

0

अमरापूर वाघुडी (पैठण) :  एम.आय.डी.सी.पोलिस ठाणे (पिंपळवाडी पि. ) वतीने ता.. 11 आँगस्ट रोजी  गावात शांतता बैठक घेण्यात आली. गणेशोत्सव आणि पोळा सण या निमित्ताने झालेल्या शांतता बैठकीत सहायक.पोलिस निरीक्षक.अर्चना पाटील यांनी गावातील नागरिकांना आवाहन केले की, आपण सर्वांनी येणाऱ्या सण, उत्सव काळात गणेश मंडळाचे पदाधिकारी  व गावकऱ्यांनी मिळून सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने गावांत स्वच्छता मोहीम राबवून गावात श्रमदानाने स्वच्छता व शासन नियमांचे पालन करून आरोग्यदायी वातावरण निर्माण केल्यास मी अभिमाने गावकऱ्यांचा सत्कार करेल, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक.अर्चना पाटील यांनी नागरिकांना केले आहे.

अनेक महिन्यांपासून कोरोनाने देशात थैमान घातले असून या आजाराला आळा घालण्याकरिता शासन सर्वतोपरीने उपाययोजना राबवून प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. गणेशोत्सव व पोळा सण तोंडावर आला आहे. अशावेळी पोलिस प्रशासन हे सतर्क झाले आहे. कोणीही नियमांचे उल्लघन करणार नाही, याची खबरदारी पोलिस प्रशासनाकडून घेतली जात आहे. एम.आय.डी.सी.पोलिस ठाण्याच्या वतीने गणेशोत्सव व पोळा सणाच्या निमित्ताने अमरापूर वाघुंडी येथे शांतता बैठक पार पडली. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक.अर्चना पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी घरात राहून अटी शर्तींचे पालन करून सण, उत्सव साजरा करावा. मंडळाने मास्क, सँनिटायझर उपलब्ध ठेवावे. नाटक, डीजे, आँर्केस्ट्रा मोठ्या आवाजात गाणी वाजवू नये. सरासरी दोन फूट उंचीची मूर्ती, मंडप न टाकता मंदिरात बसवून ८ ते १० भक्त सोशल डिस्टन्स ठेऊन आरती करणे, शक्यतो प्रतिकात्मक विसर्जन घरीच करावे, बँड न वाजवता विसर्जन करून गर्दी कमी करता येईल. स्वच्छता मोहीम राबवून गाव स्वच्छ करावे, असे केल्यास मी गावकऱ्यांचा सत्कार करेल, असेही त्या म्हणाल्या. यावेळी गोपनीय शाखेचे पी.डी.जाधव, पोलिस नाईक व्ही.एच. पवार, गावचे पोलिस पाटील कडूबाळ चाबूकस्वार, गणेश मंडळ कमिटीचे अध्यक्ष, सदस्य व गावकरी आदींची उपस्थिती होती.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.