इच्छा असूनही मी त्याबाबत बोलू शकत नाही : जयंत पाटील

'भाजपच्या विधानांना गांभीर्याने घेऊ नका, हे नाराज ते नाराज, ही भाजपची मानसिकता

0

पुणे  :‘भाजपच्या विधानांना गांभीर्याने घेऊ नका, हे नाराज ते नाराज, ही भाजपची मानसिकता आहे. पाच वर्षं सत्तेत असताना भाजपने शिवसेनेवर अन्याय करण्याची भूमिका घेतली होती. विजेची थकबाकीची वसुली कशी करायची, नागरिकांना सवलती कशा द्यायच्या आणि वसुलीला वेग कसा असावा, याकडे सरकार लक्ष देत आहे.
आचारसंहिता असल्याने माझी इच्छा असूनही मी उत्तर देऊ शकत नाही,’ अशी भूमिका जलसंपदा मंत्री जयंत पाटील  यांनी वीजबिलांबाबत व्यक्त केली. राज्यातील वीज मंडळांच्या कारभारात सुधारणा आणायचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. विधान परिषदेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने आढावा बैठकीसाठी पाटील पुण्यात आले होते. या वेळी पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी वीज बिलांमधील गोंधळ, शाळा सुरू करण्याबाबतचा प्रश्न, आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची भूमिका यावर भाष्य केले. वीज कंपन्यांचा बोजा का वाढला, त्याची चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिल्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना पाटील म्हणाले, ‘विविध स्तरांवरील ग्राहकांकडे ६७ हजार कोटी रुपयांची थकबाकी असून वीज मंडळ संकटात आले आहे. वीज पुरविणारी व्यवस्थाच भाजप सत्तेच्या अडचणीत आली असून तिची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांना सवलती देण्यासाठी ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडून करण्यात येत असलेले प्रयत्न स्तुत्य आहेत. ग्राहकांचा बोजा कमी करा, हीच महाविकास आघाडीची भूमिका आहे. सवलती देण्याच्या गणिताकडे बघत असताना वीज मंडळाच्या थकबाकीच्या गोष्टी पुढे आल्या आहेत. त्यातून बाहेर पडण्यासाठी ऊर्जा मंत्र्यांनी काही प्रस्ताव आणले असून सरकार त्यावर विचार करत आहे.’ काँग्रेस मंत्र्यांच्या खात्यांना पुरेसा निधी देण्यात येत नसल्याचा आरोप भाजपकडून होत आहे. त्याबाबत पाटील म्हणाले, ‘भाजपच्या विधानांना गांभीर्याने घेऊ नका, हे नाराज ते नाराज, ही भाजपची मानसिकता आहे. पाच वर्षे सत्तेत असताना भाजपने शिवसेनेवर अन्याय करण्याची भूमिका घेतली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या हितालाच प्राधान्य देत आहेत. ऊर्जामंत्र्यांनी दिलेल्या आठ प्रस्तावांचा अभ्यास सुरू आहे. ‘

‘एकत्रित निवडणुका लढवाव्यात’

मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेना आणि काँग्रेस स्वतंत्ररीत्या लढविण्याच्या तयारीत असल्याबाबत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘एकाच सरकारमध्ये तिन्ही पक्ष असून तिघांनीही एकत्रित आगामी निवडणुका लढवाव्यात, अशी आमची भूमिका आहे. मात्र, त्या दोन्ही पक्षांच्या वतीने मी बोलणे योग्य नाही. निवडणुका अद्याप खूप दूर आहेत. आघाडीतील तिन्ही पक्ष त्या-त्या वेळी आपली भूमिका स्पष्ट करतील, माध्यमांना सध्या का घाई लागली आहे? कोरोनाची दुसरी लाट ओसरायची आहे, त्यानंतर निवडणुका होणार आहेत,’ असे पाटील म्हणाले. पत्रकार परिषदेत पाटील यांच्या उजव्या बाजूस राज्यमंत्री विश्वजित कदम; तर डाव्या बाजूस गृहराज्यमंत्री सतेज पाटील बसले होते. या दोन्ही राज्यमंत्र्यांनी आढावा बैठकीदरम्यान जयंत पाटीलच आपले मार्गदर्शक असल्याचे म्हटले होते. याबाबत पाटील यांना छेडण्यात आले असता, ते म्हणाले, ‘सतेज पाटील यांच्या वडिलांचे आणि माझ्या वडिलांचे अत्यंत मैत्रीचे संबंध होते. तर, विश्वजित कदम यांच्या वडिलांचे मी मार्गदर्शन घेत होतो. या दोघांनी आता माझे मार्गदर्शन घ्यायचे की नाही, याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे.’

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.