मी शेतकऱ्याची लेक, बळीराजाला पाठिंबा देण्यासाठी गाझीपूर सीमेवर : सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आज गाझीपूरला जाऊन आंदोलन शेतकऱ्यांची घेतील भेट

0

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आज गाझीपूरला जाऊन आंदोलन शेतकऱ्यांची भेट घेतील. शिवसेना नेते संजय राऊतांच्या नेतृत्वाखाली सेनेच्या शिष्टमंडळाने गाझीपूरला जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर आता सुप्रिया सुळेही आज गाझीपूर सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना भेटून त्यांना आपला पाठिंबा देतील.

मी शेतकऱ्याची लेक आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांरोबर ज्या प्रकारे वागत आहे, ते पाहून दु:ख होते. मराठीमध्ये एक म्हण आहे अन्नदाता सुखी भव:… परंतु आज अन्नदाताच आंदोलन करतो आहे. मी केंद्र सरकारला एक विनंती करते की, त्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांशी चर्चा करुन त्यांना न्याय द्यावा, असे सुप्रिसा सुळे यांनी म्हटले आहे. ‘एएनआयशी’ त्या बोलत होत्या. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातही एक आंदोलन झाले. अतिशय चांगल्या प्रकारे हे आंदोलन पार पडले. केंद्र सरकार ज्याप्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय करते आहे, अशा परिस्थितीत बळीराजाला सध्या आधाराची गरज आहे. आज गाझीपूरला जाऊन मी शेतकऱ्यांशी आणि शेतकरी नेत्यांशी चर्चा करणार आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या…?
दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून बळीराजा ठाण मांडून बसला. आम्ही जरुर शहरात राहिलो, वाढलो, शिकलो, परंतु आमचे शेतकऱ्यांशी जे नाते आहे ते ईश्वर आणि भक्ताचे नाते आहे. शेतकऱ्याला अन्नदाता म्हटले जाते. पण आज अन्नदाताच आंदोलनाला बसला. त्याच अन्नदात्याला पाठिंबा देण्यासाठी एक शेतकऱ्याची लेक म्हणून मी गाझीपूरला जात आहे, असे सुळे म्हणाल्या.

संजय राऊतांनी घेतली राकेश टीकैत यांची भेट
शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली. राऊत यांनी त्यांच्याशी चर्चा करुन शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा संदेश त्यांना दिला. तसेच मुख्यमंत्री उद्ध ठाकरेंच्या सूचनेवरुन आम्ही भेटायला आल्याचंही त्यांनी सांगितले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.