धनगर समाजाचे आरक्षणासाठी आज औरंगाबाद ते जालना मानवी साखळी आंदोलन

धनगर समाज घटनेने अधिकार देऊनही आपल्या अधिकारापासून वंचित

0

औरंगाबाद :घटनेतील अनुसुचित जमातीच्या यादीत ३६ व्या क्रमांकावर असलेली धनगड हीच महाराष्ट्रातील धनगर जमात असल्याचे केंद्र व राज्य सरकाराच्या अनेक दस्तऐवजातून सिद्ध झालेले आहे. सर्वच राज्यकर्त्यांनी ते मान्य केले आहे. हा अधिकार मिळावा म्हणून राज्यातील धनगर समाज लोकशाही मार्गाने आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधत आहे.

घटनेतील अनुसुचित जमातीच्या यादीत ३६ व्या क्रमांकावर असलेली धनगड हीच महाराष्ट्रातील धनगर जमात असल्याचे केंद्र व राज्य सरकाराच्या अनेक दस्तऐवजातून सिद्ध झालेले आहे. सर्वच राज्यकर्त्यांनी ते मान्य केले. परंतु शासनाच्या उदासीनतेमुळे गेल्या ६५ वर्षांपासून धनगर समाज घटनेने अधिकार देऊनही आपल्या अधिकारापासून वंचित आहे. हा अधिकार मिळावा म्हणून राज्यातील धनगर समाज लोकशाही मार्गाने आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधत आहे. महाराष्ट्र शासन धनगर समाजाच्या मागणीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना युती सरकारच्या काळात टाटा इन्स्टिट्यूटची स्थापना करून पाच वर्षे धनगर समाजाची दिशाभूल करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देणार, अशा फक्त घोषणा केल्या. मागील सरकारच्या काळात विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख व आताचे विधानसभा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा धनगर समाजला अनुसूचित जमातीचे आरक्षण द्यावे, अशी मागणी केली तरी अजून धनगर समाजाला आरक्षण मिळालेले नाही. म्हणून आज सकाळी ११ वाजता महाराष्ट्राचे सहकारमंत्री संदिपान भुमरे यांच्या सूतगिरणी चौक येथील निवास्थानापासून ते रावसाहेब दानवे (केंद्रीय राज्य मंत्री ) भोकरदन येथील निवास्थानी ६० कि.मी. मानवी साखळी तयार करून आंदोलन करत आहे. तर राज्याच्या इतर जिल्ह्यांतील धनगर समाज अर्ध जलसमाधी आंदोलन करणार आहे. या राज्यव्यपी आंदोलनाचे नेतृत्व लहुजी शेवाळे, विठ्लराव खडके, डॉ. सुभाषराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद करत आहे. शिवाजी काटकर, काशिनाथ आरगडे, नाना साबळे, सोन्याबापू गावडे, दिगंबर खंडागळे, विठ्ठल कोरडे, प्रकाश चांगुलपाई, विष्णु खरपे आंदोलनासाठी परिश्रम घेत आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.