मल्हार सेना व धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने मानवी साखळी आंदोलन

आरक्षण कृती समितीच्या  वतीने केंब्रिज चौक, कुंभेफळ, करमाड येथे आंदोलन

0

करमाड  : कुंभेफळ व करमाड येथे मल्हार सेना व धनगर आरक्षण कृती समितीच्या  वतीने धनगर समाजाला एस टी प्रवर्गात आरक्षण मिळण्यासाठी गुरुवारी  केंब्रिज चौकात  मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. तसेच करमाड येथे हिवरा पाझर तलावात अर्ध जलसमाधी आंदोलन करण्यात आले.

करमाड येथील हिवरा पाझर तलावात अर्ध जलसमाधी आंदोलन करण्यात आले. यावेळी मल्हार सेनेचे लहुजी शेवाळे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की,गेल्या सत्तर वर्षांपासून सर्वच राजकारणी पक्ष समाजाची फसवणूक करीत आहेत. यावेळी सरकारने आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्यास समाज त्यांना माफ करणार नाही. तसेच यापुढे समाज पूर्ण जलसमाधी आंदोलन करील, असा इशारा दिला. आजच्या आंदोलनाला शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. जिजा कोरडे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव कोरडे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चांगुलपाये,विष्णू खरपे, दादाराव गायके, रावसाहेब गाडेकर, दादाराव सरोदे, राम भावले, योगेश कोरडे, राहुल कोरडे यांनी अर्ध जलसमाधी आंदोलनात सहभाग घेतला. कोणताही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल नेहुल, पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस, पोलिस उपनिरीक्षक राजू नागलोत यांच्यासह पोलिस व अग्निशमन दलाचे जवान उपस्थित होते. पोलिसांनी  आंदोलनकर्त्यांना अटक करून सर्वांना सोडून दिले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.