पीकअपचा भीषण अपघात, दुचाकीस्वारांनी दिली मृत्यूला हुलकावणी
जालना-औरंगाबाद रोडवर गाढे जळगाव फाट्यावर विचित्र अपघात
जालना : एक काळजाचा ठोका चुकवणारे अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. जालना-औरंगाबाद रोडवर गाढे जळगाव फाट्यावर बुधवारी सायंकाळी 5 च्या सुमारास विचित्र अपघात घडला. यामध्ये पीकअपचा अपघात होताना दुचाकीस्वार अगदी थोडक्यात वाचले आहेत.
औरंगाबदवरून जालन्याकडे जाणाऱ्या पीकअप चालकाचे नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरवर जाऊन आदळला.या दरम्यान समोरून येणारे एका दुचाकीवरील दोघे जण या अपघातात बालंबाल बचावले आहेत. हे दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झाले . मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. सीसीटीव्ही व्हीडिओमध्ये कशाप्रकारे पीकअप हा डिव्हायडरच्या बाजूने कलंडताना बाजूने दुचाकी गेली. पण दुचाकीस्वाराने वेळीच गाडीचा वेग वाढवून पुढे गेल्याने ते बचावले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून रस्त्याच्या मधोमध असलेले अपघाती पीकअप बाजूला करण्याचे काम सुरू आहे. तर काही वेळ रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असल्याचेही सांगण्यात आले.