ज्योतीनगर प्रभागातील नागरिकांच्या वतीने ‘मनपा कोव्हीड योध्यां’चा सन्मान

दिवाळीनिमित्त केदार देशमुख प्रस्तुत भावगीत व भक्तिगीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम

0
औरंगाबाद  : शिवसेना शाखा ज्योतीनगरच्यावतीने नगरसेवक गिरजाराम हाळनोर यांच्या सहकार्याने १९९६ पासून दरवर्षी दिवाळी निमित्त केदार देशमुख प्रस्तुत भावगीत व भक्तीगीतांचा सांस्कृतfक कार्यक्रम आयोजित करून प्रभागात सेवा देणाऱ्या मनपाच्या व इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांना दीपावली निमित्त कपडे, दिवाळी फराळ व भेट वस्तू शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे व आमदार संजय शिरसाट यांच्याहस्ते वाटप करण्यात आले.
या वर्षी कोरोना महामारीच्या जागतिक संकटामुळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करता आला नाही.  पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने ज्योतीनगर प्रभागातील विविध वसाहतीतील नागरिकांनी माजी नगरसेवक गिरजाराम हाळनोर यांच्या विनंतीस मान देऊन या वर्षी मनपा व इतर विभागातील कर्मचाऱ्यांंनी या संकट काळात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र मेहनत घेऊन ज्या नागरी सेवा पुरवल्या. जनतेची सेवा केली,  त्या सर्वांना जोड आहेर म्हणजे साडी, पॅन्ट शर्टचे कापड, दिवाळीचा घरी बनवलेला फराळ, मास्क, सॅनिटायझर या भागातील प्रसिद्ध ‘आदीश्री फूड प्रॉडक्ट’ च्या संचालिका जयश्री जोशी यांच्यातर्फे अनारसे व चकलीच्या पीठाचे पॅकेट्स वाटप करण्यात आले. एकूण जवळपास दीडशे कर्मचारी असल्यामुळे गर्दी टाळण्यासाठी दोन टप्प्यात वाटप करण्याचे ठरवून काल पहिल्या टप्प्यात या भागातील उद्योजक उद्धव आठवले व प्रतापराव धोपटे या प्रभागातील रहिवासी व मनपा अधिकारी अविनाश देशमुख, नगरसेविका सुमित्रा हाळनोर, मा नगरसेवक गिरजाराम हाळनोर यांच्या शुभहस्ते मनपा पाणी पुरवठा विभागातील लाईनमन, पम्प ऑपरेटर, स्वछता विभागातील सर्व कर्मचारी, उधाण विभागातील कर्मचारी, अखंड अन्नदान सेवेत मदत करणारे श्री विठ्ठल मंदिर संस्थांचे कर्मचारी, असे ८० कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला .
दुसऱ्या टप्प्यात   १५ नोव्हेंबर रोजी शिवसेना नेते मा चंद्रकांतजी खैरे, संभाजीनगर पश्चिम चे शिवसेना आमदार मा संजयजी शिरसाट, मनपा प्रा आरोग्य केंद्र गुरुगोविंदसिंगपुराच्या वैधकीय अधिकारी डॉ रश्मी गुजराती यांच्या शुभ हस्ते  मनपा अग्निशमन दलातील तात्पुरती नियुक्ती असलेले कर्मचारी, आरोग्य विभागातील आशा वर्कर, मलेरिया विभागातील कर्मचारी, विद्युत विभागातील कर्मचारी  घंटागाडीवर कार्यरत रेड्डी कँपनीचे कर्मचारी , बॅडमिंटन हॉल वरील कर्मचारी, महावितरण मधील लाईनमन,  प्रभागातील गरजू गरीब वॉचमन, आशा जवळपास ८०  कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री विठ्ठल मंदिर ज्योतीनगर चे सेवेकरी  व शाखा प्रमुख बापू जहागीरदार , सेवेकरी मंगेश कपोते , प्रकाश मगारे , रोहन हाळनोर , अमोल मस्के , प्रमोद जोशी गुरुजी , श्रीकांत दंडे , संदीप वाकेकर , रुख्मिनबाई  हाळनोर , सुखदेव हाळनोर , सविता हाळनोर , शाम हाळनोर , राहुल व रोहित हाळनोर , कुरे माऊशी , सुनील अत्रे गुरुजी , दिलीप चिमखडे , सुपेकर आजी, प्रकाश बहिरे , काशीनाथ मदनवाड , किणीकर काका , सौ सपरणा चिंतालवार ,  भारत निलावर , शिवप्रकाश मिटकरी , पागोरे , यांनी विशेष परिश्रम घेतले
Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.