होंडाची शानदार नवी बाईक एच नेस-सीबी 350 भारतात लाँच, किंमत फक्त…

'होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया'ने मिड साइज 350-500 सीसी मोटरसायकल सेगमेंटमध्ये एंट्री

0

मुंबई : होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाने (एचएमएसआय) भारतात मिड साइज 350-500 सीसी मोटरसायकल सेगमेंटमध्ये एंट्री केली. त्यासाठी होंडाने त्यांची नवी बाईक एच नेस-सीबी 350 लाँच केली आहे. या बाईकच्या डिलक्स व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत 1.85 लाख रुपये इतकी आहे.

‘एचएमएसआय’ या शानदार मोटारसायकलच्या बुकिगला सुरुवात करण्यात आली आहे. ज्या ग्राहकांना ही बाईक खरेदी करायची आहे, ते पाच हजार रुपये टोकन भरुन बाईकचं प्रीबुकींग करू शकतात. असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. भारतीय बाजारात ही रेट्रो स्टाईल बाईक होंडाच्या बिगविंग नेटवर्कद्वारे विकली जाणार आहे. एच नेस-सीबी 350 या बाईकमध्ये एक 350 सीसीचे पॉवरफुल 4 स्ट्रोक एअरकुल्ड, ओएचसी सिंगल-सिलेंडर आहे. त्यामध्ये पीजीएम-एफआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या बाईकमध्ये पुढे आणि मागे अधिक व्हिजिबिलिटीसाठी एलईडी सेटअप आहे. सोबतच बाईकमध्ये ड्युअल डिस्क ब्रेक, ड्युअल चॅनेल एबीएस आणि 15 लीटरचा फ्युएल टँक आहे. होंडाच्या सीबी ब्रॅण्डचा (सिरीजचा) एक मोठा इतिहास आहे. 1952 मध्ये त्याची सुरुवात करण्यात आली होती. सीबी 92 ही या सिरीजमधली पहिली बाईक होती. एच नेस-सीबी 350 ही बाईक हा इतिहास पुढे नेणार आहे. होंडा एच नेस-सीबी 350 ची क्लासिक सेगमेंटमधील बाईक्ससोबत स्पर्धा होणार आहे. या सेगमेंटमध्ये बेनेली इंपिरियाले 400, रॉयल एनफील्ड क्लासिक 350, जावा या बाईक्सची तुफान विक्री होत आहे. आगामी काळात येणारी रॉयल एनफील्ड मीटिऑर याच सेगमेंटमधील बाईक आहे. एका बाजूला नवनव्या बाईक लाँच होत आहेत, तर त्याचवेळी फेस्टीव्ह सीजन जवळ येत असल्यामुळे कंपन्या त्यांच्या प्रॉडक्ट्सवर मोठमोठ्या ऑफर देत आहेत. अनेक बाईक्सवर मोठमोठ्या ऑफर्स यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. बाईक खरेदी करु इच्छिणाऱ्यांसाठी सध्या चांगली संधी आहे.

अवघ्या एक रुपयात बाईक घरी न्या!

केवळ एक रुपया भरुन हिरो मोटो कॉर्प, होंडा, टीव्हीएससारख्या कंपन्यांच्या बाईक घरी नेता येतील. फेडरल बँकेने देशभरात 947 ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. विशेष म्हणजे या बाईक खरेदी करण्यासाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क भरावे लागणार नाही.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.