हिंगोली जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांची कोरोनावर मात
जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन - शर्मा
हिंगोली : हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी कोरोनावर मात केली आहे. सीईओ शर्मा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची तब्येत ठणठणीत झाल्याने आज दुपारी त्यांना शासकीय रुग्णालयातून सुट्टी मिळाली आहे.
हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी कोरोनावर मात केली आहे. सीईओ शर्मा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची तब्येत ठणठणीत झाल्याने आज दुपारी त्यांना शासकीय रुग्णालयातून सुट्टी मिळाली. जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस व कर्मचाऱ्यांनी यावेळी त्यांचे अभिनंदन केले. हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये कोरोनाबाधितांवर अत्यंत योग्य प्रकारे उपचार होत आहेत. येथे सर्व कोरोना बाधित रूग्णांची चांगली काळजी घेतली जात आहे. कोरोनामधून मला मुक्त केल्याबद्दल सर्व डॉक्टर्स, नर्सेस यांचे आभार मानतो.असे मनोगत मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी व्यक्त केले.